शेवगाव कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लांबणीवर पडलेली नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा बुधवारी ( दि. ११ ) येथील रेसिडेन्सिअल विद्यालयात सुरळीत पार पडली.


शेवगाव  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लांबणीवर पडलेली नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा बुधवारी ( दि. ११  ) येथील रेसिडेन्सिअल विद्यालयात सुरळीत पार पडली.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण : आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी परीक्षा केंद्रावरील वर्गात सोडले. कोरोना साथ रोगाचे नियम पाळत तालुक्यातील ३९१ पैकी ३२२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. घोटण येथील आरोग्य अधिकारी अतुल शिरसाठ व कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली.  केंद्रसंचालक तथा शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ व निरीक्षक राहूल वाघमोडे  यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य बालाजी गायकवाड, रमेश गोरे, बापूसाहेब डमरे आदींनी परीक्षेचे नियोजन व  यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.  गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड व नवोदय विद्यालयाचे प्राचार्य समाधान बोरसे यांनी परिक्षेच्या उत्कृष्ट नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News