ग्रंथपाल दिनानिमित्त रोटरी क्लब वेस्टएंड च्या वतीने पुणे श्रमिक पत्रकारसंघ ग्रंथालयास पुस्तके प्रदान.


ग्रंथपाल दिनानिमित्त रोटरी क्लब वेस्टएंड च्या वतीने पुणे श्रमिक पत्रकारसंघ ग्रंथालयास पुस्तके प्रदान.

छायाचित्र : पुस्तके हस्तांतर प्रसंगी मान्यवर.

भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर रंगनाथन यांच्या जयंती निमित्त १२ ऑगस्ट हा ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो.या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ वेस्टएंडच्या वतीने पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ग्रंथालयास विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तके प्रदान करण्यात आली. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब वेस्टेंडचे अध्यक्ष रो.शैलेश नांदुरकर खजिनदार रो.ललित राऊत,माजी अध्यक्ष रो.सुनीता चांदवणकर,रो आदित्य देवधर,फर्स्ट लेडी श्रद्धा नांदुरकर,रो.राजेंद्र सोनार. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर,सरचिटणीस सुजीत तांबडे,उपाध्यक्ष विकी कांबळे,चिटणीस प्रसाद पाठक,पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर,खजिनदार चंद्र्कांत हंचाटे,ग्रंथपाल वनिता पासलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी रोटरी सर्वांनी ग्रंथालयास भेट देवून कामकाजाची माहिती घेतली.जाहिरात
Search
विडिओ
Recent News