वृक्ष गणना संदर्भातील


वृक्ष गणना संदर्भातील

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारातील सर्व खाजगी आणि सरकारी जागेवरील  GIS  पद्धतीने वृक्ष गणनेचे कामकाज 2018 साली सुरू करण्यात आले.2 वर्ष वृक्षगणनेचे कामकाज पूर्ण करून 3 वर्षे देखभाल असे  5 वर्षाचे कामकाजाचे स्वरूप होते .परंतु में.टेरेकखन  इकोटेक प्रा.लि. या संस्थेने वृक्ष गणनेच्या कामकाजात निष्काळजीपणा दाखवून खुप मोठ्या प्रमाणावर पालिकेचा पैसा आणि वेळ वाया घालविला आहे.दोन वेळा लाखो रुपये दंड ठोठावूनही आणि एक वेळा मुदतवाढ देऊनही दिलेल्या मुदतीत.वृक्षगणनेचे कामकाज पूर्ण न झाल्यामुळे सदर ठेकेदारास कामकाजातील विनाकारण विलंब, अनियमितता यामुळे. वृक्ष गणनेचे कामकाज पूर्ण होण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे.जागतिक वायू बदलाचे परिणाम महाराष्ट्र राज्य पुर स्वरूपात पाहत आहे.वक्ष जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असल्यामुळे उपलब्ध वृक्षांची गणना करून ते जतन करण्यासंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याने आज दिवसभर उद्यान विभागातील झाडांवर बसून आंदोलन करत आहोत.जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही झाडांवर बसून आंदोलन करत आहोत.


आमच्या प्रमुख मागण्या :-


1) में.टेरेकोन इकोटेक प्रा .लि या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे.


2) संबंधित ठेकेदाराकडून 2 लाख 73 हजार रुपये दंड वसूल करण्यात यावा.


3) संबंधित ठेकेदारास पाठिशी घालणा-या अधिका-यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी.

  या आमच्या रयत विद्यार्थी परिषदेच्या मागण्या आहेत यावेळी उपस्थित.परिषदेचे अध्यक्ष सुर्यकांत सरवदे, रविराज काळे, ऋषिकेश कानवटे, ओमकार भोईर,अजय चव्हाण, आदी सदस्यांनी उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग नेहरूनगर पिंपरी -18  आंदोलन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News