पुण्याच्या हातकागद संस्थेवरील माहितीपटाची स्वतंत्रता विज्ञान फिल्म फेस्टिवल साठी निवड


पुण्याच्या हातकागद संस्थेवरील माहितीपटाची स्वतंत्रता विज्ञान फिल्म  फेस्टिवल साठी निवड

पुणे :पुण्याच्या हातकागद संस्थेवरील हातकागज संस्था -भारत की एक विरासत  या माहितीपटाची   स्वतंत्रता विज्ञान फिल्म  फेस्टिवल साठी निवड झाली आहे . पुण्यातील प्राध्यापक डॉ बाळकृष्ण दामले यांनी हा माहितीपट तयार केला आहे. केंद्रीय विज्ञान  तंत्रज्ञान मंत्रालय  विज्ञान प्रसार विभागामार्फत,फिल्म्स डिव्हिजन ,विज्ञान भारती आणि माहिती प्रसारण मंत्रालय यांनी संयुक्तपणे  हा फिल्म फेस्टिवल १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला असून  भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात शास्त्रज्ञ ,शिक्षक ,विज्ञान संवादकांच्या योगदानाला उजाळा देण्यात येणार आहे . 


 हातकागज संस्था -भारत की एक विरासत  या माहितीपटाची निर्मिती डॉ बाळकृष्ण दामले यांनी केली . संपादन वासिम पठाण ,निवेदन मोहिनी दामले यांचे आहे तर लेखनासाठी प्रभाकर गोसावी ,दिनेश लोहपात्रे यांनी विषयतज्ज्ञ या नात्याने मार्गदर्शन  केले . 


  अशा प्रकारची हातकागद  संस्था असावी ही मूळची महात्मा गांधी यांची कल्पना होती . पुण्यातील एक संशोधक कृष्णाजी बापुजी उर्फ के. बी. जोशी यांच्या संशोधन आणि संकल्पनेतून १९४० मध्ये ही संस्था साकारली गेली. पं. नेहरू यांनी संस्थेचे उद्घाटन केले होते. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्थेला भेट दिल्यानंतर येथील हातकागदाचे उत्पादन पाहून या संस्थेत तयार झालेल्या कागदांवरच घटना लिहिली जावी, अशी इच्छा व्यक्त केली होती  आणि त्याप्रमाणे भारताची घटना या संस्थेत उत्पादित झालेल्या कागदांवरच लिहिली गेली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News