कलाकारांनी स्वत:ला एकटे समजू नये—मेघराजराजे भोसले


कलाकारांनी स्वत:ला एकटे समजू नये—मेघराजराजे भोसले

पुणे प्रतिनिधी/ सागरराज बोदगिरे: कलाकारांनी स्वत:ला एकटे समजू नये. चित्रपट महामंडळ आणि शासनं आपल्या पाठिशी आहे, यापुढेही कलाकारांना मदत केली जाईल असं आश्वासन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिलं. कलाकारांना जीवनाश्यक वस्तूं वाटप कार्यक्रमत ते बोलत होते.– कोरोनामुळं चित्रपट व्यवसाय बंद आहे, या व्यवसायावर अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ अवलंबून आहेत. गेले दिड वर्षे कलाकारांच्या हाताला काम नाही, अशा कालाकारांना नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशनं आणि मदत वेलफेअर ट्रस्ट पुणे यांनी जीवनाश्यक वस्तूंची मदत दिलीया. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशनंचे विश्वस्त उमेश कोठीकर, दिपाली वारुळे, अनुश्री काळे , Tell A Tale Media Pvt Ltd निर्मित आणि Colors मराठी प्रस्तुत *जीव माझा गुंतला या मालिकेतील कलाकार सौरभ चौगले, योगिता चव्हाण, प्रतीक्षा मुणगेकर, अजय कुरणे दिग्दर्शक यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ३०० कलाकारांना जीवनश्यक वस्तूंच्या किटच वाटप करण्यात आलं. यावेळी बोलतांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी कलाकारांना  धीर दिला. शासनानं राज्यातील ५६ हजार कलाकारांना ५ हजार रुपयांची मदत केली असून, तुम्हा कलाकारांनाही ही मदत मिळणार असल्याचं सांगितलं. कलाकारांनी स्वत:ला एकटे समजू नका चित्रपट महामंडळ आणि शासनं आपल्या पाठिशी असल्याचं सांगितलं. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशनंचे विशस्त उमेश कोठीकर यांनी या ही पुढे कलाकारांना मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला अभिनेत्री पुजा पवार यांच्यासह महामंडळाचे जिल्ह्यातील सभासद यावेळी उपस्थित होते.

यावेळी संचालक शरद चव्हाण, संचालक रवींद्र गावडे, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, आदी उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News