आय टी ऑलिम्पियाडचे पारितोषिक वितरण


आय टी ऑलिम्पियाडचे पारितोषिक वितरण

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट (वेदा)च्या वतीने आयोजित आय टी ऑलिम्पियाडचे पारितोषिक वितरण संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. आझम कॅम्पस येथे १० ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम झाला. झैनब शेख(भिवंडी),मोहम्मद अनास हकीम(पुणे) यांना छोट्या गटातील विजेतेपद मिळाले.अब्दुस सामी खान (नंदुरबार),अकसा शेख (पुणे) यांना मोठ्या गटातील विजेतेपद देण्यात आले.जाहिदा अन्सारी,गुंजन जैन,शहनाझ शरीफ,नसरीन शेख या शिक्षकांनाही गौरविण्यात आले. या वर्षी देशभरातील ३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी या ऑलिम्पियाडमध्ये सहभाग घेतला.विजेत्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप,टॅब,पेन ड्राइव्ह,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.डॉ ऋषी आचार्य यांनी प्रास्ताविक केले.प्रा.इरफान शेख,अंजुम काजळेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News