खाजगी याचिकेचा व वकीलाचा खर्च पुणे महानगरपालिकेने करून सदर खर्च पुणेकराच्या माठी मारले म्हणून शिवसेनेचे भीक मागो आंदोलन


खाजगी याचिकेचा व वकीलाचा खर्च पुणे महानगरपालिकेने करून सदर खर्च पुणेकराच्या माठी मारले म्हणून शिवसेनेचे भीक मागो आंदोलन

पुणे: पुणे महानगरपालिका आयुक्त आपण एम एमसी ऍक्ट प्रमाणे राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पुणे महानगरपालिकेचे काम बघत आहात.आपण प्रशासकीय प्रमूख असल्या कारणामुळे राज्य सरकारच्या विरोधात खाजगी जनहित याचिका दाखल करणाया वकिलांचा व याचिकेचा खर्च पुणेकरांच्या माठी मारू नका .भाजपा सत्ताधाऱ्यांकडून होत असणारा भ्रष्टाचार रोखण्याचे करतोय पुणे महानगरपालिका आयुक्त म्हणून आपले आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपाचे पाशवी बहुमत असल्यामुळे अशा प्रकारचे चुकीचे निर्णय घेतले जात आहेत असे चुकीचे निर्णय आपण ताबडतोब थांबबावेत म्हणून आज पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ शिवसेनेने भीक मांगो आंदोलन केले.

भीक मागा भाजप सरकार भीक मागा ,भाजप चे करायचे काय अश्या आंदोलनाच्या वेळी घोषणा शिवसेना कार्यकत्या कडून व महानगर पालिकेतील नगरसेवका कडून देण्यात आल्या. या आंदोलनात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे,विजय देशमुख पुणे जिल्हा प्रुमख शिवसेना, रमेश कोडें, संगीता ठोसर, सविता मटे, व महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते.

आंदोलनाच्या वेळी संजय मोरे म्हणाले,

पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट केल्या 23 गावांचा विकास आराखड्याच्या नियोजनासाठी

राज्य सरकारने स्थापन केलेल्या महानगर नियोजन समिती विरोधात भाजपच्या काही नगरसेवकांनी

खाजगी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली सदर याचिका खाजगी महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात असून पुणे महानगरपालिकेचे पालकत्व महाराष्ट्र राज्य सरकारकडे असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पुणे महानगरपालिका याचिका दाखल करू शकत नाही .असे असतानाही केवळ राजकीय स्वार्थापोटी दाखल झालेल्या जनहित याचिकेचा खर्च भाजपच्या नगरसेवकांना करण्याची ऐपत नसल्यामुळे .पुणेकर नागरिकांच्या करू पी पैशातून याचिके चाखर्च पुणे महानगरपालिकेच्या निधीतून करण्याचा घाट भाजपातील नगरसेवकांचा आहे.

यासाठी त्यांनी स्थायी समितीमध्ये यासंदर्भातील ठराव मंजूर केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत विकासासाठी योग्य आहे पुणेकर नागरिकांचे आहे परंतु राजकीय स्वार्थासाठी काही व्यावसायिकांचे आर्थिक हित  संबंध जोपासण्यासाठी आराखड्याच्या व नियोजन समितीच्या विरोधात खाजगी जनहित याचिका दाखल करून त्यांचा खर्च पुणेकर नागरिकांच्या करुपी पैशातून करण्याचा प्रयत्न सत्ताधारी नगरसेवक करीत आहे. व अशाप्रकारे पुणेकर नागरिकांच्या बहुमताच्या जोरावर फसवणूक करण्याचे पाप तरी भाजप करीत आहे.

म्हणून आज आम्ही भीक मांगो आंदोलन करत आहोत .

जर पालिकेने या अटी मान्य केला नाही. तर यापुढेही हे आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात करू असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News