कर्जत उपविभागातील सर्व खाजगी सावकारकी मोडीत काढणार - आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी


कर्जत उपविभागातील सर्व खाजगी सावकारकी मोडीत काढणार - आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी

कर्जत प्रतिनिधी - (मोतीराम शिंदे) 

कर्जत पोलिस उपविभागातील कर्जत आणि जामखेड येथे खाजगी सावकारांच्या जाचातून अनेक पीडित व्यवसायिक, शेतकरी सामान्यांची सुटका होताना दिसत असून ही मोहीम सर्व पोलिसांनी खाजगी सावकारां विरुद्ध उघडलेल्या मोहिमेतून शक्य होत आहे. त्यामुळे खाजगी सावकाराकडून त्रास होत असलेल्या अनेक कुटुंबांनी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे आभार व्यक्त केले आहेत.

          खाजगी सावकारी ही अनादी काळापासून चालत आलेली असून यात कर्ज घेणारा गरजू आणि सामान्य असल्याने सावकाराच्या अटीनुसार आपली जमीन-जुमला घर-दार सावकाराला लिहून देत असे, परंतु वेळेत व्याजाचे पैसे न आल्याने हे सावकार लोक आणि त्यांचे काही कमिशन वर वसुली साठी ठेवलेले पंटर हे त्या गरजू शेतकरी आणि लहान व्यावसायिक आणि सामान्य माणसाकडे पैशासाठी तगादा लावत असे वेळप्रसंगी घरातील साहित्य, वाहन अगदी अन्नधान्य देखील घेऊन जायचे मुद्दल भेटली तरी व्याजावर व्याज वाढून कर्जाचा डोंगर अधिकाधिक वाढवत असत. आणि यातून सुटका न झाल्यास काही पिडीत अगदी स्वतःच्या जीवाचे बरेवाईट सुद्धा करून घेत असत आणि या पैशातून सावकार श्रीमंत आणि गरीब अधिकच गरीब होत होते. परंतु कोणत्याही गोष्टीचा एक ठराविक काळ असतो आणि तो काळ संपण्याचा कधी ना कधी एक क्षण येतो आणि अशाच व्याजाच्या पैशावर व्याजावर व्याज खाऊन गलेलठ्ठ   झालेल्या खाजगी सावकारांचा काळ बनून आले  ते म्हणजे कर्जतचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, जाधव यांच्या आदेशानुसार कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी गोरगरीब समाजाचे रक्त पिणाऱ्या खाजगी सावकारां विरुद्ध जनतेला आवाहन करून एक जाहीर मोहीमच उघडली आणि खाजगी सावकारांच्या जाचाला आणि जुलमाने त्रस्त झालेल्या सामान्य नागरिक, व्यवसायिक आणि शेतकऱ्यांसाठी  बुडत्याला काठीचा आधार मिळावा अशी परिस्थिती निर्माण झाली आणि खाजगी सावकार आणि त्यांच्या पंटर पासून होणाऱ्या त्रासाचे गाऱ्हाणे ऐकणारे पोलीस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची भावना निर्माण झाल्याने एकामागून एक तक्रारी प्राप्त होताच कर्जतचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचा निपटारा करून अनेक जुलमी  सावकारांना पोलीसी खाक्या दाखवून तुरुंगाची हवा खायला लावली यात कर्जतमध्ये खाजगी सावकारांविरुद्ध पाच गुन्हे तर जामखेडमध्ये तीन असे एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले. या मोहिमे अंतर्गत उपविभागातील कर्जत आणि जामखेड पोलीस ठाण्यात  खाजगी सावकाराविरुद्ध १४ तक्रारी प्राप्त झाल्या असून यापैकी ८ तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून  ६ तक्रारींचे आपसात तडजोड  करण्यात आल्या असून यातून व्याजाच्या पाशातून सव्वा कोटी रुपयांच्या तगाद्यातून अनेक गोरगरीब आणि सामान्यांची  सावकारांच्या जाचातून  सुटका झाली आहे. यात जमीन, वाहन आणि रोख रक्कमेचा  समावेश आहे एका गुन्ह्यात दोन लाख मुद्दलीसाठी २५ लाखाची जमीन खाजगी सावकाराने बळाच्या जोरावरती लिहून घेतले बाबत सदर मोहिमेतून समोर आले आहे.


चौकट - 

सावकारां नी टाकले अंग 

काहीही म्हणा दोन हाना पण, सावकार म्हणू नका !

 कर्जत पोलिस उपविभागातील कर्जत आणि जामखेड तालुक्यात पोलिसांनी खाजगी सावकारां विरुद्ध उघडलेल्या मोहिमेमुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळत असून दुसरीकडे खाजगी सावकारांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत . एकेकाळी एखाद्याने सावकार म्हणून मारलेल्या हाकेने छाती फुगविणारे   सावकार आता मात्र हात जोडून दोन शिव्या द्या पण सावकार म्हणू नका हो असे जनतेला सांगत आहेत.


जाहीर आवाहन - 

इथून पुढच्याही काळात  पोलीसांची खाजगी सावकारांच्या विरुध्दची कारवाई कडक करण्यात येणार असून सावकारांच्या जाचातून पीडित  कुटुंबांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहून सावकाराच्या विरुद्ध असणारी ही मोहीम अधिक तीव्र करून सामान्य जनतेला या त्रासापासून मुक्त करु असे आश्वासन कर्जतचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी जनतेला दिले आहेत .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News