आयटी ऑलिम्पियाड स्पर्धेत कु. अक्सा तांबटकर सर्वप्रथम


आयटी ऑलिम्पियाड स्पर्धेत  कु. अक्सा तांबटकर सर्वप्रथम

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) : भारतातील प्रसिद्ध ऑनलाईन आयटी ऑलिम्पियाड चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्याच्या आबेदा इनामदार महाविद्यालयाची (मुलींचे) विद्यार्थिनी व पत्रकार सरवर तांबटकर यांची कन्या कु. अक्सा ही या स्पर्धेमध्ये प्रथम आली आहे.

या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये अक्सा ही प्रथम आली. या महाविद्यालयात सलग तिसर्‍या वर्षी विविध स्पर्धांमध्ये अक्सा ही प्रथम आलेली आहे. याबद्दल तिला संस्थेचे प्रमुख पी. ए. इनामदार यांच्या हस्ते लॅपटॉप, मोठी ट्रॉफी, मेडल व सर्टिफिकेट देऊन तिचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या शिक्षिका व मार्गदर्शक शेख शहनाज शरीफ यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी अंजुम इनामदार, डॉ. आर. के. आचार्य यांच्यासह शिक्षक-शिक्षिका, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कु. अक्सा हिच्या या यशाबद्दल डॉ. संदीप सुराणा, डॉ. भंडारी, डॉ. रंगनाथ सांगळे, अ‍ॅड. हाफीज जहागीरदार, डॉ. श्रीकांत चेमटे, अ‍ॅड. अशोक बोरा, निवृत्त आरटीओ अधिकारी सय्यद शहा निजाम, हाजी शौकतभाई तांबोळी आदींनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News