घराच्या हक्कासाठी दांडेकर पूल परिसरातील नागरिकांचे आंदोलन


घराच्या हक्कासाठी दांडेकर पूल परिसरातील नागरिकांचे आंदोलन

पुणे:पुण्यातील आंबील ओढा परिसरातील घरांवर गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज दांडेकर पूल परिसरात आंबील ओढा येथील नागरिकांनी आंदोलन  केले,यावेळी इन्कलाब जिंदाबाद, हम सब एक हैं, पडलेली घरे बांधून मिळालीच पाहिजे.अश्या घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला.कोणतीही माहिती न देता आंबील ओढ्यातील नागरिकांची घरे कोणाच्या सांगण्यावरून पाडली हा सवाल यावेळी तिथल्या रहिवाशी नागरिकांनी उपस्थित केला.

आम्ही पाकिस्तानचे नागरिक नाही आमच्यावर अशी कारवाई करू नका असे म्हणत पुण्याचे महापौर त्याचबरोबर या परिसरातील आमदार आणि खासदार व सत्ताधारी भाजप पक्ष सत्तेचा माज करून आमच्यावर अशा कारवाया करत आहे .ज्यात हे सर्व लोक बिल्डरला सामील झाले आहेत असा आरोप  बहुजन एकता परिषद या संघटनेच्या वतीने करण्यात आला .बिल्डर्सकडून आम्हाला अनेक ऑफर्स येतात मात्र आम्हाला अशा ऑफर्स नको. तर आमची घरे द्या आणि आमच्यावर होणारा अन्याय थांबवा .अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी नागरिकांनी व्यक्त केली .आम्हाला आमच्या स्त्रियांना त्रास दिला जातो. तरीही पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. अशी संतप्त प्रतिक्रिया देखील नागरिकांनी व्यक्त केली आहेत. हे पोलिसांना ही माहिती आहे .त्यांची नावे आम्ही सांगण्याची गरज नाही. असं म्हणत नागरिकांनी आयुक्त आणि पोलिसांवरही कारवाई केली. जावी अशा भावना व्यक्त केल्या. या आंदोलनाला आंबील ओढा येथील नागरिक व बहुजन एकता परिषद चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन एकता परिषदचे महाराष्ट्र अध्यक्ष किशोर कांबळे यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News