पोलीस अधिकारी यांना मारहाण व धक्काबुक्की केल्याने तिन जणांवर घोडेगाव पोलीसांनी केला गुन्हा दाखल.


पोलीस अधिकारी यांना मारहाण व धक्काबुक्की केल्याने तिन जणांवर घोडेगाव पोलीसांनी केला  गुन्हा दाखल.

विलास काळे, घोडेगाव प्रतिनिधी:  श्री क्षेत्र भिमाशंकर रस्त्यावरील पालखेवाडी येथे श्री क्षेत्र भीमाशंकर येथील श्रावणी यात्रेनिमित्त बंदोबस्तावर असलेले पोलीस अधिकारी यांना मारहाण व धक्काबुक्की केल्याची घटना घडली असुन याबाबत तिन जणांवर घोडेगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

     घोडेगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशान्वये पर्यटन व भीमाशंकर मंदिर परीसरात फिरण्यास बंदी असूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक येत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधिकारी व कर्मचारी पालखेवाडी (ता. आंबेगाव) येथे करत असताना महादेव मधुकर जाधवर (वय-३८), मिनाक्षी महादेव जाधवर (वय-३०) व मिना लक्ष्मण दराडे (वय-४०) सर्व रा. समर्थ पार्क २२१ साक्षी अथर्व निवास लेन नं. ५ केसनंद, ता. हवेली, जि. पुणे. या तिन व्यक्ति दि. ९ रोजी रात्री ९.३० चे दरम्यान मानवी जिवितास धोकादायक असलेल्या कोरोना विषाणुचा संसर्ग प्रादुर्भाव पसरण्याची जाणीव असताना देखिल तोंडाला मास्क न लावता संगणमत करून भीमाशंकरकडे दर्शनासाठी जायचे आहे असे सांगुन त्यांनी गाडी रस्त्याचे मधोमध लावून रस्ता अडवुन सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी केंगले व डयुटीकामी नेमलेल्या अंमलदारांना शिवागाळ, दमदाटी करून सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी केंगले यांच्या उजव्या गालावर महादेव जाधवर यांनी चापट मारून बोचकाडून जखमी करून हाताने मारहाण व जखमी केले.

     तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षक केंगले यांचे बरोबर शासकीय गणवेशात काम करत असलेले अंमलदार यांच्याही शासकीय कामात अडथळा आणुन सदर ठिकाणी आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. याबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी केंगले यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहू शिंगाडे करत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News