श्रीगोंदा पोलीसांची अवैद्य धंद्याविरुद्ध विशेष मोहीम


श्रीगोंदा पोलीसांची अवैद्य धंद्याविरुद्ध विशेष मोहीम

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी :-श्रीगोंदा पोलीस स्टेशन अंतर्गत दरोडा, चोरी, घरफोडी, जबरी चोरी व तसेच शरीराविरुध्दचे गुन्हे ज्यामध्ये खुन खुनाचा प्रयत्न शस्त्र वापरुन गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना आळा बसावा म्हणुन वेळोवेळी विशेष मोहीमे अंतर्गत कारवाया करण्यात आल्या आहेत.

  वेळोवेळी गुन्हेगार वस्त्यांवर पाच कॉबिंग ऑपरेशन राबवुन रेकॉर्डवरील१९ आरोपींना अटक करण्यात आली. मोक्यातील तीन आरोपी अटक करून पुढील कारवाईकरीता पुणे जिल्ह्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन, शिरुर पोलीस स्टेशन, लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले. दरोडा, घरफोडी व चोरीचे गंभिर स्वरुपाचे गुन्हे उघड करण्यात आले असून त्यांचेकडुन २६ लाख रु किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२प्रमाणे ४ से केल्या असुन १२४ प्रमाणे कारवाई केली आहे. त्यामध्ये २०हजार रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

   श्रीगोंदा शहर व काष्टी मध्ये मद्य प्राशन करुन सार्वजनिक ठीकाणी उपद्रव करणारे ५ आरोपींविरुध्द मुंबई प्रो. का. क ८५ (१) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनीक ठीकाणी उपद्रवकरुन शांतता भंग करणा-या १६ ईसमां विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. कोयता गॅंग मधील दोन सदस्यांना अटक करुन त्यांचेकडुन शस्त्र जप्त करुन त्यांचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे २ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

   अवैद्य जुगार खेळणा-या १८ आरोपींवर कारवाई करुन त्यांचेकडुन जुगारातील १६ हजार८७० रु किंमतीचा मुद्देमाल जप्तगत करण्यात आला आहे. गावठी हातभट्टीची दारु तयार करणारे व अवैद्य दारु विक्री करणा-यावर छापे टाकुण २२ आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अन्वये गुन्हे दाखल करून ४६ हजार४९ रु किंमतीचा माल जप्त केला आहे.

  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विनामास्क फिरणारे सोशल डिस्टसिंगचे पालन न करणारे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणारे, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे व्यक्तींवर कारवाया करुन ३लाख१०हजार रु पर्यंत दंड वसुल केला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक मनोज पाटील साहेब,अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी  अण्णासाहेब जाधवसाहेब, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News