खरीप हंगामी पिकांसाठी खतांचा अनियमित पुरवठा,बहुजन मुक्ती पार्टीचे तहसीलदारांना निवेदन


खरीप हंगामी पिकांसाठी खतांचा अनियमित पुरवठा,बहुजन मुक्ती पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड तालुक्यात खरीप हंगामातील पिकांसाठी लागणाऱ्या खतांचा पुरवठा अनियमित होत असल्याबाबत बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने देण्यात आल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष गोरख फुलारी यांनी सांगितले आहे,तालुका कृषी अधिकारी  तसेच  मा. तहसीलदारसो, साहेबांना बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने निवेदन देण्यात आले,त्यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे  चालू हंगामामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी अत्यावश्यक असा युरिया (नत्र) त्याचबरोबर १८-४६-० या खतांचा अनियमित पुरवठा होत आहे त्याबाबत. 

     या प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे नुतन तालुका अध्यक्ष मा. गोरख जगन्नाथ फुलारी तसेच पार्टीचे दौंड शहर प्रभारी मा. मनोहर कोकरे तसेच छत्रपती क्रांती सेना दौंड ता. अध्यक्ष मा. अशोक मोरे सर  तसेच भारत मुक्ती मोर्चा पुणे जिल्हा महासचिव मा. निलेश बनकर मा. बी. डी. गायकवाड  मा. धोत्रे इ. पदाधिकारी या प्रसंगी उपस्थीत होते. सदर विषया संदर्भात ठोस निर्णय न झाल्यास या प्रकरणी येत्या २ दिवसात तिव्र आंदोलनाचा इशारा पार्टीचे दौंड ता. अध्यक्ष मा. गोरख जगन्नाथ फुलारी यांनी दिला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News