आमरण उपोषणाला ही किंमत नाही


आमरण उपोषणाला ही किंमत नाही

आरोग्य खात्याचा कणा असलेल्या अधिपरिचारिका दिनांक 10 रोजी आमरण उपोषणाला बसल्या तरीही एका महिला अधिकाऱ्याला घाम फुटत नाही.मागणी काय फक्त प्रशासकीय बदली  कर्मचाऱ्यांच्या  सोयीनुसार करण्यात यावी म्हणजेच मुख्यालय ते मुख्यालय जिल्ह्याच्या बाहेर करण्यात येऊ नये. कोरोना काळात रुग्णांची सेवा करता करता कितीतरी आधी परिचारिकांना आपला जीव गमवावा लागला आहे .त्यांनी कधी स्वतःची जबाबदारी नाकारली नाही .स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांच्या जीवासाठी लढत राहिल्या हे ऑफिस मध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना समजायला हवे. परंतु शाबासकीची एक थाप तर नाहीच पण अन्यायकारक बदल्या मात्र चालू. पुण्यातल्या कर्मचाऱ्याला  इंदापूर, पंढरपूर सातारा अशा ठिकाणी बदली करून स्वतःच्या कुटुंबापासून दूर ठेवून काय साध्य करणार आहात? बदली जर मनासारखी असेल तर कर्मचारी मन लावून  काम करेल कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर मनात थोडीशी किल्मिषे नक्कीच राहते .सर्वजण विनंती करतो की सोयीनुसार बदली मिळाली तर रुग्णसेवेचे देशहित आम्ही कायम पुढे चालू ठेउ. रुग्णसेवेत आमच्या कडून कोणती ही दिरंगाई होणार नाही परंतु आमची बदली सोयीनुसार करावी. अधिपरीचारिका मध्ये जास्त करून महिला असल्याने महिलांवर होणारा अन्याय थांबवावा

जाहिरात
Search
विडिओ
Recent News