कर्जत शहरातील व्यावसायिकांना दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी


कर्जत शहरातील व्यावसायिकांना दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - दुकानांची वेळ वाढवावी व सातही दिवस दुकाने चालू ठेवण्याची मुभा द्यावी अशी मागणी कर्जत शहर में रोड व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली. 

दुकानांची वेळ वाढवावी व दुकाने एकही दिवस बंद ठेवू नये या मागणीसाठी कर्जत शहरातील मेन रोड व्यापारी संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना लेखी निवेदन देऊन त्यांच्यासोबत सर्व व्यापाऱ्यांनी चर्चा केली यावेळी संघटनेचे अध्यक्ष गणेश जेवरे  व पप्पू शेठ तोरडमल , काका लांगोरे गणेश तोरडमल, सुभाष माळवे, हरिश्चंद्र गायकवाड, संतोष काळे, रवी किरण नेवसे, सोमनाथ भैलुमे, योगेश कानडे, उमेश तापकीर, अंकुश गुंड, शेखर सायकर, किरण काशीद, प्रदीप कुलथे, रवींद्र सुपेकर, नामदेव थोरात, अविनाश चौधरी, व्यापारी आघाडीचे प्रसाद शहा संजय काकडे, नितीन बोरा यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते

कर्जत बस स्थानक का पासून सर्व व्यापाऱ्यांनी चालत जाऊन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निवेदन दिले तहसीलदार नानासाहेब आगळे व नगरपंचायत चे मुख्याधिकारी गोविंद जाधव हे यावेळी अनुपस्थित होते. 

यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष गणेश जेवरे म्हणाले की

कोरोना चे संकट खऱ्या अर्थाने सर्व व्यापारी बांधवावर आले आहे प्रशासन नागरीकांच्या आरोग्यासाठी जनता कर्फ्यू लावत आहे. दुकाने बंद ठेवत आहेत दुकानांच्या वेळ कमी केल्या आहेत यामुळे प्रश्न निर्माण होतो कि कोरोना फक्त व्यापारी बांधवामुळेच होत आहे  कोरानामुळे छोटे व्यापारी तर उध्वस्थ झाले आहेत अनेकांची उपासमार सुरू आहे. यामुळे आता  कोठे तरी या बाबत निर्णय घेण्याची वेळ आली असून आम्ही प्रशासनाला सर्व सहकार्य करणार आहोत. सर्व नियम पाळणार आहोत मात्र आमच्या  कूटूबांचा विचार देखील प्रशासनाने करावा अशी मागणी जेवरे यांनी केली. तसेच दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवावीत आणि नगरपंचायत ने व्यापाऱ्यांकडून दोन वर्ष जागा भाडे  रद्द करावे तसेच महावितरण विभागाने व्यापाऱ्यांची वीज बिल माफ करावे व पुढील काळामध्ये कोणत्याही व्यापाऱ्याला आर्थिक दंड किंवा त्याचे दुकान सील करू नये तर केवळ नोटीस बजावण्यात यावी

रुग्णसंख्या पाहून निर्णय घ्यावा

यावेळी  पुढे बोलताना गणेश जेवरे पुढे म्हणाले की प्रशासनाने सरसकट निर्णय न घेता ज्या गावांमध्ये ज्या परिसरामध्ये जेवढी रुग्णसंख्या आहे त्यानुसार निर्णय घेण्याची वेळ आली आहे कारण ज्या ठिकाणी रुग्ण आढळत नाहीत त्या ठिकाणचे नागरिक व्यापारी विनाकारण भरडले जात आहेत यामुळे प्रशासनाने आता विचाराची पद्धत बदलण्याची गरज आहे आणि तसे केले नाही तर आम्ही प्रशासनाचे न ऐकता दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवणार आहोत असा इशारा देखील गणेश जेवरे यांनी यावेळी दिला

 यावेळी बोलताना प्रसाद शहा यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी आणि समस्या मांडल्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यावेळी बोलताना म्हणाले की व्यापाऱ्यांनी ज्या मागण्या याठिकाणी मांडल्या आहेत त्या योग्य आहेत खऱ्या अर्थानं व्यापारी बांधव संकटात आहेत परंतु आम्हाला देखील सर्व नागरिकांचे संरक्षण करावयाचे आहे याबाबत सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे आहेत तुमच्या सर्व भावना मागण्या वरिष्ठ पातळीवर आम्ही नक्की करू व याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत विनंती करू असे आश्वासन यादव यांनी दिले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News