अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेलवर छापा .. दोघे जण अटकेत तर तीन पीडितांची सुटका


अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेलवर छापा .. दोघे जण अटकेत तर तीन पीडितांची सुटका

पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाची दमदार कारवाई...!

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे ) शिरूर तालुक्यातील पुणे नगर महामार्गावर सरदवाडी गावाजवळच हॉटेल ओम साई येथे सुरू असणाऱ्या अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्या या हॉटेल वर पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तीन पीडितांची सुटका करण्यात आली.

        पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार,पुणे- नगर महामार्गावर सरदवाडी गावच्या हद्दीत ओम साई

हॉटेल येथे हॉटेलचे चालक व मॅनेजर कडून काही

महिलांकडून देह विक्री करवून घेतला जात

असल्याची गोपनीय माहिती पुणे ग्रामीण गुन्हे

शाखेच्या पथकाला मिळताच पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली ओम साई हॉटेल येथे बनावट ग्राहक पाठवून या मिळालेल्या माहितीची रीतसर खात्री करून पोलिसांनी छापा टाकला असता ओम साई हॉटेलच्या मॅनेजर शिवकांत सत्यदेव कश्यप आणि चालक पारस बस्तीमल परमार यांना ताब्यात घेऊन तीन पीडित महिला पीडितांची सुटका करण्यात आली.

     शिरूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच सरदवाडी येथील  एका हॉटेल वर कारवाई करत देह विक्री  करणाऱ्या महिलांची सुटका करत आरोपींना अटक केली होती परंतु त्यानंतर फक्त दोनच दिवसानंतर पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच सरदवाडी गावच्या भागात कारवाई करण्यात आली.

        सदरची कारवाई पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे,पोलिस उपनिरीक्षक माधवी देशमुख,सहायक फौजदार शब्बीर पठाण,तुषार पंदारे,लता जगताप, पोलिस हवालदार सचिन घाडगे,जनार्दन शेळके,राजू मोमीन,मंगेश थिगळे,अजित भुजबळ,पूनम गुंड, मुकेश कदम या पथकाने केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News