क्षेत्रसभा आणि घन कचरा विषयावर ऑनलाईन चर्चासत्रास प्रतिसाद


क्षेत्रसभा आणि घन कचरा  विषयावर ऑनलाईन चर्चासत्रास प्रतिसाद

कचरा वेचकांना स्थैर्य मिळावे :पौर्णिमा चिकरमाने 

पुणे :   क्षेत्रसभा ( वॉर्ड सभा) यांचे महत्व आणि घन कचरा  या  विषयावर  ९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. पौर्णिमा चिकरमाने(स्वच संस्था),  अॅड.  सौ. वर्षा विद्या  विलास(एरिया सभा समर्थन मंच महाराष्ट्र) ,अस्लम इसाक बागवान (इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप,क्षेत्रसभा समर्थन मंच )  हे मान्यवर सहभागी झाले.   

                                                    क्षेत्रसभा  ( वॉर्ड सभा )यांचे महत्व, नगरराज विधेयक 2009ची अंमलबजावणी व्हावी,७४ व्या घटना दुरुस्तीमधील कलम २४३ ज्ञ नुसार घन कचरा विषयक चर्चा  व प्रशासकीय कार्यात जनतेचा सहभाग कसा वाढावा याविषयी चर्चा झाली.


 पौर्णिमा चिकरमाने यांनी  स्वच  संस्थेची माहिती दिली. कचरा वेचकांचे नाते स्वच्छता ,नागरिक आणि कचऱ्याशी आहे . कचरा वेचणे हे सार्वजनिक आरोग्याबरोबर पर्यावरण जपणुकीचेही काम असल्याचे त्यांनी सांगीतले. कोवीड साथीच्या काळातही हे काम कचरा वेचकांनी थांबवले नाही.वर्क फ्रॉम होम  चा पर्याय त्यांना उपलब्ध नव्हता . कचरा वर्गीकरणात नागरिकांनी पुढाकार घ्यावा, समाजाने त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहावे आणि कचरा वेचकांना स्थैर्य मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन त्यांनी केले.


अॅड. वर्षा विद्या विलास यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे सांगीतले. त्या म्हणाल्या, विकासकामे, त्यावरील खर्च याबाबत नागरिकांनी सूचनाद्वारे फक्त सुचवायचे नाही, तर निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे.प्रभागात काय काम व्हावे हे लोक ठरवतील ,फक्त सुचविणार नाहीत. क्षेत्रसभा नियमानुसार ,ठरलेल्या कालावधीत होत राहिल्या पाहिजेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे पारदर्शक कारभार करणारे असावेत आणि जनतेला उत्तरदायी असावेत. त्यासाठी मोठया प्रमाणावर जनजागृती केली पाहिजे.प्रभाग समित्या स्थापन झाल्या पाहिजेत ,त्यात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असला पाहिजे . राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत ,ते सोडविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News