श्रीगोंदा आगाराच्या वाहक व चालकांनी घडविले माणुसकीचे दर्शन.


श्रीगोंदा आगाराच्या वाहक व चालकांनी घडविले माणुसकीचे दर्शन.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी- श्रीगोंदा आगाराची श्रीगोंदा ते स्वारगेट एस.टी. सकाळी ६.३० वाजता मार्गस्थ झाली. सोमवार असल्याने व विद्यार्थ्यांची परिक्षा असल्याने एस.टी.मध्ये खुप प्रवासी प्रवास करत होते. श्रीगोंदा फॅक्टरी नजिक ढोकराई फाट्यावर काही जण एस.टी.मध्ये बसले. गाडी काष्टीच्या पुढे गेल्यावर एक वयस्क इसम मागील सीटवरुन उठुन पुढे दारात येऊन बसले. वाहकाने त्यासंबधी पुढे का आले? उतरायचे आहे का? अशी चौकशी करत असताना ते इसम गाडीतच कोसळले. नाकातुन रक्त येऊ लागले. वाहकांस ही लक्षात आली की, हा हार्टअॅटॅक असु शकतो. बाकीचे प्रवासी घाबरले. सर्वजण बाजुला सरकले. मदतीस कोणीही पुढे येत नव्हते. शिवाय कोरोनाची भिती मनात असल्याने कोणीही हात लावत नव्हते. वाहक अमोल मोटे यांनी तात्काळ प्रथमोपचार सुरु केले. स्वत:चा रुमाल काढुन नाकातुन येत असलेले रक्त पुसले. छाती वर दाब देण्यास सुरुवात केली. पण ते इसम कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते. म्हणुन मोकळी हवा भेटावी या हेतुने चालक साहेबराव शिंदे व वाहक अमोल मोटे यांनी त्या इसमास गाडी थांबवुन खाली घेऊन छातीवर दाब देण्याचेसुरुच ठेवले. हात व पाय चोळले परंतु ते इसम प्रतिक्रिया देत नसल्याने पुढील निर्णय करण्यासाठी आगार प्रमुख शिंदे व आगार वहातुक निरिक्षक रोकडे यांच्याशी संपर्क साधला. एस.टी.तात्काळ माघारी घेऊन जवळच असलेले मातोश्री हॉस्पीटल, काष्टी येथे त्या इसमास भर्ती केले. डॉ.लाड यांनी सुध्दा तात्काळ उपचार सुरु केले.

    यासंबधी पोष्ट करुन दक्ष नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांना पाठविली. आणि एस.टी. पुन्हा स्वारगेटच्या दिशेने मार्गस्थ केली. दत्ताजींनी वाहक यांच्याशी संपर्क करुन वस्तुस्थिती समजुन घेतली. तालुक्यातील महत्वाच्या व्हाटसअपच्या ग्रुपवर फोटोसह माहिती प्रदर्शित केली. याचबरोबर ते जोशीवस्ती, श्रीगोंदा फॅक्टरी येथील असावे या हेतुने तेथे संपर्क केला. तो पर्यंत घारगाव येथुन आकाश परदेशी यांनी दत्ताजींना फोनवरुन सांगितले की ते इसम माझ्या राजु बाबर या मित्राचे चुलते असुन श्रीगोंदा फॅक्टरी वरील जोशीवस्ती येथील मोहन भैरु बाबर आहेत. परदेशींकडुन फोन नंबर घेऊन बाबर यांच्याशी संपर्क केला. खरंतर सकाळ पासुनच त्यांना अस्वस्थ वाटत होते. परंतु श्रावणातील पहिलाच सोमवार असल्याने व घरात हालाकिची परिस्थिती असल्याने भिक्षा मागण्यासाठी ते बाहेर पडले होते. कोरोनामुळे मुलांना उद्योगधंदे नाहीत. घरात खाणारे तोंडे जास्त. यामुळे स्वत:चे दुखणे लपवत बाहेर पडले होते.

      दुपारी एस.टी.स्वारगेटहुन परत आल्यावर दक्षच्यावतीने वाहक अमोल मोटे व चालक साहेबराव शिंदे यांचे आगार प्रमुख शिंदे व आगार वहातुक निरिक्षक रोकडे यांचे उपस्थितीमध्ये शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

    एकेकाळी तमाशा क्षेत्रात उत्तम पेटी वादक म्हणुन नावलौकीक होते. अनेक नामवंत तमाशात त्यांनी मागणी होती. मध्यंतरी सुरेखा पुणेकर यासुध्दा यांच्या घरी येऊन गेल्या होत्या. परंतु हाताला किरकोळ दुखापत होऊन तो हात काढावा लागल्याने तमाशा क्षेत्रातुन बाहेर पडावे लागले होते. तेव्हा पासुन ते भिक्षा मागुन कुटुंबाचा गाडा चालवत होते.  परंतु काल अचानक हार्टअॅटॅक आल्याने बाबर कुटुंबावर संकट कोसळले. संध्याकाळी दक्षची टिममधील दत्ताजी जगताप, श्रीरंग साळवे, नारायण ढाकणे,समीर पांढरकर, सतिष पोटे, संतोष गव्हाणे आदी जण बाबर यांच्या घरी जावुन चौकशी व सांत्वन करुन आले. मोहन बाबर यांना घरी आणल्यावर काही वेळानंतर पुन्हा अस्वस्थ वाटु लागल्याने दौंड येथे पुढील उपचारासाठी भर्ती करण्यात आले. त्यांच्या घरातील परिस्थिती हालाकिची असल्याने आर्थिक मदतीचे आवाहन दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या माध्यमातुन दत्ताजी जगताप यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News