20 तारखेला नांदेड येथे अशोक चव्हाण यांच्या घरासमोर मराठी क्रांती मोर्चा आंदोलन करणार


20  तारखेला नांदेड येथे अशोक चव्हाण यांच्या घरासमोर मराठी क्रांती मोर्चा आंदोलन करणार

पुणे: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस तापलेला दिसत आहे . एकीकडे राज्य सरकार मराठा आरक्षण प्रकरणी केंद्राकडे बोट दाखवत आहे तर केंद्र आमचा काही संबंध नाही आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारच्या ताब्यात येतो.

आज पुण्यात मराठा क्रांती मोर्चा ची राज्यस्तरीय बैठक छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत पार पडली . या बैठकीला राज्यातून मराठा क्रांती मोर्चा चे सन्मयवक, पदाधिकारी कार्यकर्ते व मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते.

या बैठकीत मराठा आरक्षण मिळण्यासाठी कसे प्रयत्न करता येईल यांची चर्चा झाली. या बैठकीनंतर मराठी क्रांती मोर्चाच्या सन्मयवकानीं पत्रकार परिषद घेत आपली पुढची भूमिका मांडली.

एमपीएससी त ज्या मराठा समाजाचे जे विद्यार्थी अभ्यास करून सिलेक्ट झालेले विद्यार्थी त्याच्या नियुक्त्या रखडल्या आहेत .मराठा समाजाला अजूनही 50 टक्के आरक्षण हे राज्य सरकारने दिले नाही .हे प्रश्न धरून आम्ही येत्या 20 तारखेला नांदेड येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर मराठी क्रांती मोर्चा चे पदाधिकारी कार्यकर्ते व   संभाजी राजे यांच्या उपस्थितीत आम्ही आंदोलन करणार आहोत. अशि  माहिती मराठी क्रांती मोर्चाच्याचे सन्मयवक सचिन खेडकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत माहिती दिली.

मराठा आरक्षण मुद्यावर आता खेळ नको. आम्ही आता जो निर्णय घेऊ तो शासनाला परवडणारा नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल घेतली नाही तर कोणतेही सरकार महाराष्ट्रावर राज्य करणार नाही, असा सज्जड दम मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या चिंतन बैठकीत देण्यात आला.  जे आमदार खासदार मराठा समाजाला मदत करीत नाहीत हेटाळणी करतात त्यांना यापुढे विचार करावा लागेल, असा इशाराही  पत्रकार परिषदेत मराठा क्रांती ठोक मोर्चा कडून देण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News