राव-लक्ष्मी ट्रस्ट व शिरूरपूर्वभागातील ग्रामस्थांची पूरग्रस्तांना मदत.


राव-लक्ष्मी ट्रस्ट व शिरूरपूर्वभागातील ग्रामस्थांची पूरग्रस्तांना मदत.

वडगाव रासाई, ता. शिरूर : पूरग्रस्तांसाठी मदतीतीचा धनादेश सुजाता पवार यांच्या कडे सुपूर्द करताना मांडवगण फराटा ग्रामस्थ.
मांडवगण फराटा : प्रतिनिधी (हनुमंत पंडित)ता. ९ : रावलक्ष्मी ट्रस्टच्या वतीने आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मांडवगण फराटा ( ता. शिरूर ) येथील ग्रामस्थांनी पुरग्रस्तांसाठी १० क्विंटल गहू, साखर, तांदूळ तसेच एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये मदत केली.
            सदर मदत ग्रामस्थांच्या वतीने सुजाता पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, पोलीस पाटील बाबा पाटील फराटे, दत्तात्रय फराटे, सरपंच शिवाजी कदम, संभाजी फराटे, मनिषा सोनवणे, शरद चकोर, राजेंद्र जगताप उपस्थित होते.

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News