पावसाने ओढ दिली पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा


पावसाने ओढ दिली पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा

कोपरगाव प्रतिनिधी /राजेंद्र तासकर

पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले मात्र कोपरगाव परिसरात पाऊसाने ओढ दिली असून पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू असल्याचे दिसून येत आहे

पावसाळ्याच्या सुरुवातीला कोपरगाव तालुक्यात थोडाफार पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी त्याच पावसावर सोयाबीन, मका, बाजरीची पेरणी केली 

  बी,बियाणे,खते, मेहनत मशागती साठी मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी पिके उभी केली मात्र मागील एक महिन्यापासून पावसाने ओढ दिली असून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे 

कोपरगाव तालुक्यातून गोदावरी नदीतून पाणी वाहत आहे तर कधी काळी या दिवसात ओहर फ्लो चे पाणी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यातून सोडले जायचे मात्र महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाऊस होत असला तरी कोपरगाव तालुका व धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस नसल्याने आजून तरी पाट पाणी नाही पाऊस नसल्याने विहिरींनी देखील तळ गाठला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी  सोयाबीन मका पिके जगवण्यासाठी अनेक ठिकाणी स्प्रिंकलर चा आधार घेतल्याचे दिसून येते मात्र दिवस भर पडणारे ऊन, सुसाट वाहणारा वारा त्यामुळे स्प्रिंकलर च्या पाण्याचा देखील फारसा परिणाम होताना दिसत नाही पाऊस नसल्याने हाती तोंडी आलेले पीक जळून जाऊ नये म्हणून शेतकरी पिके जगवण्यासाठी महागडी स्प्रिंकलर सेट, पाईप आदी च्या माध्यमातून पिके जगवण्यासाठी आटापिटा सुरू आहे मात्र गोदावरी कालव्यातून पाणी आवर्तन मिळाले तरी कालव्याच्या काठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र इतर शेतकऱ्यांची पिके वाचायची असतील तर मोठ्या पावसाची आवश्यकता आहे मात्र आजून तरी तशी शक्यता वाटत नसली तरी कृत्रिम पाऊस पाडावा म्हणून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व पावसा अभावी जळणाऱ्या पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News