मुस्लिम फाउंडेशन पूरग्रस्तांसाठी कुशल कारागीर व स्वच्छता दुत झाले दाखल


मुस्लिम फाउंडेशन पूरग्रस्तांसाठी कुशल कारागीर व स्वच्छता दुत झाले दाखल

महाड (रायगड)दिनांक रविवार  --- महाड येथील पूरग्रस्तांना संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ चालू आहे.परंतु कोंढवा येथील नगरसेवक हाजी गफुर पठाण ,मुस्लिम फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने प्लंबर, इलेक्ट्रिशियन ,गॅस शेगडी फिटर,तसेच सुमारे 50 स्वच्छतादुत अशा एका अनोख्या आणि अत्यंत आवश्यक अशी मदत घेऊन हाजी गफुरभाई पठाण पूरग्रस्तांना आदर्श आणि आवश्यक अशी मदत मुस्लिम सामजाच्या वतीने करीत आहेत . आज   रायगड जिल्ह्यातील महाड येथे नगरसेवक हाजी गफुर पठाण आणि मुस्लिम फाउंडेशन कोंढवा येथील कुशल कामगार आणि स्वच्छता दुत यांनी आज महाड येथे वेगळ्या पद्धतीतीने सामाजिक कार्याचा आदर्श दाखवून दिला.

                   यावेळी कोंढवा परिसरातील सुमारे 50 ते 100 विविध प्रकारचे कारागीर आणि स्वच्छता दुत महाड येथील पूरग्रस्तांच्या सेवेसाठी दाखल झाले आहेत . यामधे अंबुलन्स, ड्रेनेज व पाणी व इतर ब्लॉक काढण्यासाठी चे जेटींग मशीन ,विविध गरजू वस्तूच्या गाड्या तसेच आवश्यक साधनसामग्री घेऊन नगरसेवक हाजी गफुरभाई पठाण आपल्या पथकासह महाड येथे सेवा करीत आहेत .त्यांच्या या कार्याचा महाड वासिय नागरिकांनी मनपूर्वक कौतुक केले .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News