सणवार विशेष!! आपत्काळात "श्रावणी सोमवार" चे व्रत कसे अंगीकारावे ?


सणवार विशेष!! आपत्काळात "श्रावणी सोमवार" चे व्रत कसे अंगीकारावे ?

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी -- यावर्षी "श्रावणी सोमवार" हे व्रत  9, 16, 23, 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर या दिवशी  केले जाईल. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालण्याचा प्रघात आहे. यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्रावणी सोमवारचे व्रत नेहमीप्रमाणे करण्यास काही ठिकाणी मर्यादा असू शकतात. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपत्काळातील (कोरोनाच्या संकटकाळातील) निर्बंधांमध्ये जेथे घराबाहेर पडून शिवालयात जाणे शक्य नाही, त्यांनी आपद्धर्मा’चा भाग म्हणून घरी राहूनच हे व्रत कशाप्रकारे अंगीकारावे, याविषयी लेखात धर्मशास्त्राधारित विवेचन करण्यात आले आहे.

1. श्रावण सोमवारी उपवास करून शिवाची विधीवत् पूजा करणे

उपोषितः शुचिर्भूत्वा सोमवारे जितेन्द्रियः।

वैदिकैर्लौकिकैर्मन्त्रैर्विधिवत्पूजयेच्छिवम् 

– ग्रंथ व्रत राज

अर्थ : संयम आणि शुचिर्भूतपणा आदी नियमांचे पालन करत सोमवारी उपवास करून वैदिक अथवा लौकिक मंत्राने शिवाची विधीवत् पूजा करावी.

शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.

2. शिवाची पूजा कशी करावी ?

अ. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी.

आ. शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी.

इ. शिवाच्या चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी.

ई. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर शिवाचा ॐ नमः शिवाय । हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो.

3. शिवामूठ व्रत   

विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणार्‍या चार सोमवारी ४ प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News