अहिल्यादेवी जयंती उत्सव समीतीचा उपक्रम कौतुकास्पद - दत्तात्रय भरणे


अहिल्यादेवी जयंती उत्सव समीतीचा उपक्रम कौतुकास्पद - दत्तात्रय भरणे

भिगवण येथील अहिल्यादेवी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

नानासाहेब मारकड भिगवण (प्रतिनिधी):

 अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक आहे दरवर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम घेउन समाजाला अहिल्यादेवींच्या आदर्शावर चालण्याचे धडे भिगवण जयंती उत्सव समिती करत आहे असे भिगवण येथे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलताना म्हणाले.

       राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीने ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या याचे पारितोषिक वितरण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते होते, यावेळी  जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रताप पाटील,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ आदी उपस्थित होते. 

       यावेळी राज्यातील २०  स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले व रुग्ण सेवेत ३२ वर्ष कार्यरत असणाऱ्या डॉ. सुनिल दराडे यांना आरोग्य सेवक जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला तर कोविड काळात रुग्ण सेवा करणाऱ्या सचिन बोगावत, नानासाहेब  मारकड आणि मोहिनी मलगुंडे यांना कोविड योद्धा पुरस्कार देण्यात आला.

       यावर्षी कोविड मुळे मुलांना मुल्यवर्धीत शिक्षण देण्यास अडचण निर्माण झाली आहे मात्र जयंती उत्सव समितीने ऑनलाईन वक्तृत्व आणि वेशभूषा स्पर्धा घेउन राज्यातील मुलांना संस्काराचे धडे मिळण्यास मदत झाली आहे, समितीने अहिल्यादेवींच्या जयंती निमित्त शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या चरित्रांचे धडे द्यायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त करुन समितीला स्मारकासाठी सर्व मदत केली जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी भिगवण येथे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात बोलताना दिली.

     कार्यक्रमाचे आयोजन अनिल तांबे तर निमंत्रक आबा बंडगर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव बंडगर यांनी केले तर प्रस्ताविक दादा थोरात यांनी केले व आभार नितिन चितळकर यांनी व्यक्त केले.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News