समाज सेवा म्हणजेच परमार्थ नेत्रदान संकल्पातून तोच प्रयत्न : माउली मामा


समाज सेवा म्हणजेच परमार्थ नेत्रदान संकल्पातून तोच प्रयत्न : माउली मामा

संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने  १२बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली मामा व पदाधिकारी सावता महाराजांना अभिवादन करतांना.यावेळी नेत्रदानाचा संकल्प करण्यात आला

बारा बलुतेदार महासंघाचे संत सावता  महाराजांना अभिवादन 

संजय सावंत अहमदनगर प्रतिनिधी : संसार सुखाचा करणे आणि समाज सेवा करणे म्हणजे खरा परमार्थ आहे. कामावर प्रेम करा, कृतज्ञता भाव ठेवा असे  सावता महाराज म्हणत असत. उपेक्षितांना मदत करण्याचा भगवंताचाच प्रयत्न असल्याच विविध संतांनी सांगून त्याच अनुकरण स्वतः केलं. नेत्रदान संकल्प हा त्याचाच एक भाग आहे. असे प्रतिपादन बाराबलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माउली मामा गायकवाड यांनी केले. 

माळीवाडा येथील संत सावता महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात महासंघाच्या सदस्यांनी नेत्रदानाचा संकल्प करून सावता महाराजांना अभिवादन केले, यावेळी श्री माउली मामा बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ होते. संत साहित्याने समाज जोडून उपेक्षितांना मदत करण्यासाठी प्रबोधन केले असून कर्म आणि सामाजिक जाणीव हे संत सावता महाराजांचे जीवन चरित्र आहे.संत सावता महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात बाराबलुतेदारांनी सावता  महाराजांना अभिवादन करतांना नेत्रदान संकल्पाचा स्तुत्य उपक्रम केला आहे. असे अध्यक्षीय भाषणात श्री भुजबळ  यांनी सांगितले, तर आपल्या नेत्रांमुळे दृष्टीहीन  व्यक्तींना दृष्टी मिळाली तर आपल्या मृत्यू नंतरही ते आपल्या डोळ्यांनी  जग पाहू शकतील असं कार्य म्हणजे नेत्रदान होय ते करण्याचा  संकल्प आपण करावा असे आवाहन समाजसेवक जालिंदर बोरुडे यांनी केले. 

माळीवाडा पंच मंडळाचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष ॲड, अभय आगरकर , गुरु संगमनाथ महाराज तसेच सचिव अशोक कानडे आदि विश्वस्त , भजन कीर्तनकार, भाविक आदींच्या उपस्थितीत आरतीनंतर नेत्रदान संकल्पाचे फॉर्म महासंघाच्या सदस्यांनी भरून दिले. भाविकांनीही स्वखुशीने फॉर्म भरून महासंघाच्या उपक्रमात सहभाग घेतला. माझ्या मृत्यूनंतर माझ्या डोळ्यांचा  उपयोग कोणाही अंध व्यक्तीला दृष्टी देण्यासाठी माझी संमती आहे, असे संमती पत्र शासकीय रुग्णालयाच्या नेत्रपेढीला  यावेळी लिहून देण्यात आले. महासंघाचे सचिव श्रीकांत मांढरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल इवळे , शहर अध्यक्ष शाम औटी, जिल्हा सचिव श्री बागुल, युवाध्यक्ष  आर्यन गिरमे, संपर्क प्रमुख संदीप सोनावणे, सुरेश ढवण , नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल निकम, वैभव टांकसाळी, आदी या प्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी पत्रकार राजेश सटाणकर यांनी नेत्रदान संकल्पाची माहिती दिली. 


सेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते , युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम भैय्या राठोड, श्री.संत सावताश्रम शिक्षण संस्थेचे चेअरमन व नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर, बाबासाहेब पटवेकर आदींनी संत सावता महाराजांना  अभिवादन करतांना या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. शेवटी अनिल इवळे यांनी आभार मानले.



जाहिरात
Search
विडिओ
Recent News