पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांचेकडून दौंड पोलिसांना आधुनिक स्पीड बोट उपलब्ध,वाळू चोरांना दणका


पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांचेकडून दौंड पोलिसांना आधुनिक स्पीड बोट उपलब्ध,वाळू चोरांना दणका

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी दौंड पोलीस स्टेशनला आधुनिक स्पीड बोट उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे वाळू चोरांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांचे हात अजून बळकट झाल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे,

आपत्ती व्यवस्थापन डीजायस्टर मॅनेजमेंट व वाळू चोरी रोखण्यासाठी दौंड पोलीस स्टेशन ला पोलिस अधीक्षक कार्यालया कडून आधुनिक  स्पीड बोट उपलब्ध करून  देण्यात आली आहे,सर्वात जास्त नदी किनारा तसेच पुर परिस्तिथी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख साहेब यांनी दौड पोलिस स्टेशन ला आधुनिक अशी स्पीड बोट उपलब्ध करून दिली आहे 12/15 लोकांची बसण्याची व्यवस्था असलेली आधुनिक अशी बोट तसेच12 लाईफ जॅकेट दौंड पोलीस स्टेशन येथे उपलब्ध झाली असून त्याचे आज दौड पोलिस निरीक्षक  नारायण पवार यांच्या उपस्थितीत  भीमा नदी पात्रात उतरून प्रात्यक्षिक घेण्यात आले याचा वापर पूर नियंत्रण परिस्तिथी मध्ये लोकांचे जीव वाचवण्यासाठी  तसेच डीजायस्टर मॅनेजमेंट याकरिता व महत्वाचे म्हणजे वाळू चोरी रोखण्यासाठी  करणार असून कारवाई करण्यास गेल्या नंतर बोट सोडून पळून जाणाऱ्या वाळू चोरांना पकडण्यासाठी आम्हाला याचा जास्त फायदा होणार आहे असे  पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले,ते पुढे म्हणाले या स्पीड बोट मुळे वाळू माफियांना चांगलाच वचक बसणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News