श्रावी मिडिया अँड फिल्म प्रोडक्शन तर्फे मोहम्मद रफी स्मृतिदिन व किशोर कुमार जयंतीनिमित्त मोहम्मद रफी व किशोर कुमार यांच्या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे आज 8 ऑगस्ट 2021 रोजी पुण्यात रेझोनन्स स्टुडिओ येथून फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजन


श्रावी मिडिया अँड फिल्म प्रोडक्शन तर्फे मोहम्मद रफी स्मृतिदिन व किशोर कुमार जयंतीनिमित्त मोहम्मद रफी व किशोर कुमार यांच्या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे आज  8 ऑगस्ट 2021 रोजी पुण्यात रेझोनन्स स्टुडिओ येथून फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजन

पुणे -श्रावी मिडिया अँड फिल्म प्रोडक्शन तर्फे मोहम्मद रफी स्मृतिदिन व किशोर कुमार जयंतीनिमित्त मोहम्मद रफी व किशोर कुमार यांच्या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे  8 ऑगस्ट 2021 रोजी सायं 5 ते 8 या वेळेत  पुण्यात रेझोनन्स स्टुडिओ येथून फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजन करण्यात आले आहे. 

          या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ज्ञानश्री फाउंडेशनचे अध्यक्ष झोहेर चुनावाला, ज्ञानश्री फाउंडेशनचे  उपाध्यक्ष अमर काळे, सामाजिक कार्यकर्ते अजित कुमठेकर, मिडिया प्रोफेशनल करुणा पाटील, दिवाना हुआ बादल कार्यक्रमाचे प्रायोजक चटक-मटक फूड कॉर्नर चे संचालक कौस्तुभ कुलकर्णी व वृषाली कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी दिवाना हुआ बादल संगीत कार्यक्रमाचा संयोजिका व गायिका अनुपमा कुलकर्णी, दिवाना हुआ बादल कार्यक्रमाचे संयोजक व श्रावी  मिडिया व फिल्म प्रोडक्शनचे संचालक  दिवाना हुआ बादल कार्यक्रमाचे संयोजक विवेक कुमार तायडे,  श्रावी  मिडिया अँड फिल्म प्रोडक्शन चे कार्यकारी संचालक, दिवाना हुआ बादल कार्यक्रमाचे संयोजक व गायक प्रशांत निकम आदी  मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीमुळे हा कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आला  आहे.

         या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना गायिका अनुपमा कुलकर्णी , श्रावी मिडिया अँड फिल्म प्रोडक्शनचे कार्यकारी संचालक व गायक प्रशांत निकम ,  श्रावी मिडिया  अँड  फिल्म प्रोडक्शन चे संचालक  विवेककुमार तायडे यांनी केले आहे. 

        या कार्यक्रमामध्ये अनुपमा कुलकर्णी, प्रशांत निकम, अंजली पंढरपूरे,सारंग कुलकर्णी, विजय चौधरी हे गायक व  गायिका आपले बहारदार गीते सादर करणार आहेत.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आकाश सोळंकी करणार असून कार्यक्रमाचे ध्वनी मुद्रण पुण्यातील प्रसिद्ध ध्वनिमुद्रणकार हेमंत उत्तेकर करणार आहेत तर कार्यक्रमाचे पूर्ण फेसबूक लाईव्ह प्रसारण छायाचित्रणकार शितल उत्तेकर करणार आहेत. कोरोना महामारीच्या काळात आपले मन उत्साही व तजेलदार ठेवण्यासाठी तसेच नैराश्यातून मुक्त होण्यासाठी, हार्ट अटॅक ,डायबिटीस अशा आजार असलेल्या रुग्णांसाठी  असे जुन्या गाण्यांचे कार्यक्रम नक्कीच लाभदायक असतात.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News