कोठेवाडी येथील भगिनींना महाराष्ट्र शासनाची एतिहासिक राखी भेट


कोठेवाडी येथील भगिनींना महाराष्ट्र शासनाची एतिहासिक राखी भेट

महिला अत्याचाराच्या प्रश्नावर कोठेवाडी ग्रामस्थांना योग्य तो शस्त्र परवाना देण्याचा निर्णय

https://youtu.be/tIN-F4WOuv0

पुणे, ७ आगस्ट: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी  येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील बारा आरोपींची मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून सुटका करण्यात येत असल्याचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. संदर्भित विषयावर गावातील ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. भेटीत तेथील माता भगिनींनी शस्त्र परवाना मिळावा अशी मागणी केली. तत्काल मागणी मान्य करत गृहमंत्र्यांनी कोठेवाडी ग्रामस्थांनी योग्य त्या नियमानुसार त्यांना शस्त्र परवाने द्या ते यांना द्या अाशा सुचना देखील दिल्या. बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती ना.डॉ. नीलमताई गोर्हे, नगरचे पोलीस निरीक्षक मनोज पाटील, डी. वाय. एस. पी. सुदर्शन मुंडे उपस्थित होते. 


ग्रामस्थांसमावेत झालेल्या या बैठकीत डॉ. नीलमताई गोर्हे यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या त्यामध्ये प्रामुख्याने गावात संरक्षण वाढवावे, गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर नजर असवी यासाठी सीसीटीव्ही दुरूस्ती करून द्यावे, ग्राम रक्षक दलामार्फत समन्वय करून द्याव जेणेकरून काही अडचणी असतील तर पोलीस आणि सरकारचे सहाय्यता त्यांना मिळू शकेल. या बैठकीत महिला अत्याचाराच्या प्रश्नावर भगिनींनी शस्त्र परवाना मिळावा या हाकेला परवाना देण्याचा एतिहासिक निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला हे राखी पेक्षा अनोखी भेट शासनाने दिली त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याचे ही त्यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News