धक्कादायक! भरदिवसा एका चोरट्याने गोळीबार करत.. पतसंस्थेतील पाच लाख रुपयांची केली लुट


धक्कादायक! भरदिवसा एका चोरट्याने गोळीबार करत.. पतसंस्थेतील पाच लाख रुपयांची केली लुट

शिरूर (प्रतिनिधी)-   अप्पासाहेब ढवळे 

             अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील बेलवंडी फाट्यावर असलेल्या  पारनेर ग्रामीण पतसंस्थेत बाईक वरून आलेल्या एका चोरट्याने चोरी करत पाच लाख रुपये लुटून पोबारा केला आहे. या चोराने भरदिवसा गोळीबार करत चोरी केलीय. यावेळी त्याने सुमारे पाच लाख रुपयांची रोकड चोरून नेली. गोळीबारात पतसंस्थेचे व्यवस्थापक गंभीर जखमी झाले असून प्रथम त्यांना शिरूर(जि.पुणे) इथे  नेण्यात आले नंतर त्यांची गंभीर परस्थिती पाहून त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे बाळासाहेब सोनवणे असल्याची महिती आहे.

        पारनेर ग्रामीण पतसंस्थेत सुमारे १५ लाख रुपयांची रोकड होती. त्यातील चोराने पाच लाख रुपये चोरून नेले आहेत. चोरी करत असताना पतसंस्थेमध्ये एकच महिला कर्मचारी होती. चोराच्या दहशतीसमोर महिला कर्मचारी घाबरली आणि बाहेर पळून गेली. पतसंस्थेचे व्यवस्थापक कार्यालया बाहेर होते. त्यांनी कार्यालयात येताच चोराने त्यांच्यावर समोरून गोळीबार केला.त्यात ते गंभीर जखमी झाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News