गोमांस घेऊन जाणारे वाहन पकडले; बेलवंडी पोलिसांची कारवाई


गोमांस घेऊन जाणारे वाहन पकडले; बेलवंडी पोलिसांची कारवाई

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी

बेलवंडी पोलिसांनी नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन करुन रेकॉर्डवरील पाहिजे असलेले फरारी आरोपी पकडणे याबाबत विशेष मोहिम चालू केली असता सदर मोहिमेचे अनुंषगाने बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे हे अवैध धंदया बाबत माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि,नगर-पुणे हायवेने एक कार गाडी गोमांस घेऊन पुणेकडे जात आहे.या गाडीमध्ये ५५०किलो गोमांस होते.शुक्रवारी (दि.६) ऑगस्ट रोजी रात्री १च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

    याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात योगेश रोहीदास गोरडे रा.सावरगाव ता.जुन्नर जि.पुणे,रोशन मधुकर गुरसाळे रा.जामरुंग,जि.रायगड याच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे.

    याबाबत मिळालेली माहिती अशी कि,पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे हे नगर-पुणे हायवेवर गव्हाणेवाडी येथे नाकाबंदी दरम्यान एक मांझा कंपनीची कार एम.एच. सी.आर. ४१६६  ही अडवून तिची पाहणी केली असता १ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे ५५०किलो गोमांस  व गाडी जप्त करण्यात आली आहे.

   याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोना संतोष गोमसाळे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करून अटक करण्याची कारवाई करण्यात आली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोहे.कॉ ज्ञानेश्वर पठारे हे करीत आहे.

   तसेच कोबिंग ऑपरेशन दरम्यान ३ वा. बेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.न.  २२७/२०२१ भा.द.वि.क. ३९५, सह आर्म ऍक्ट ३/२५, ४/२५ या गुन्हयातील फरारी आरोपी चंद्रकांत भाऊसाहेब घावटे रा.शेळकेवाडी राजापूर ता.श्रीगोंदा यास कोबिंग ऑपरेशन दरम्यान पकडण्यात येऊन त्यास नमूद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास पो.नि.संपतराव शिंदे हे करीत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News