श्री सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्यावतीने अभिवादन


श्री सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्यावतीने अभिवादन

 - श्री सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्यावतीने माळीवाडा येथील मंदिरातील त्यांच्या मुर्तीस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, शहर प्रमुख दिलीप सातपुते, समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, बाळासाहेब भुजबळ, राजेश सटाणकर, बाबासाहेब पटवेकर, जालिंदर बोरुडे आदि. (छाया: राजु खरपुडे )

सावता महाराजांनी अभंगातून प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य केले - दिलीप सातपुते

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - प्राचीन काळापासून या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक शूर, वीर, संत मंडळी होऊन गेले. अनेक संतांनी वारकरी संप्रदायाला खरी शोभा मिळवून दिली. मानवता, समता, विश्वबंधूता या नितीमूल्यांवर आधारित असलेला हा वारकरी संप्रदाय आज सुद्धा दरवर्षी आषाढी - कार्तिकी एकादशीला लाखो लोकांचा, वारकर्‍यांचा समुदाय पंढरीच्या पांडूरंगांच्या दर्शनासाठी जातो. कांदा, मुळा भाजी.. अवघी विठाई माझी.. या अभंगाने प्रत्येक वारकर्‍याच्या मनावर राज्य करणारे संत म्हणजेच सावता माळी होय. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने आपण मार्गक्रमण केले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते श्री सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्यावतीने माळीवाडा येथील मंदिरातील त्यांच्या मुर्तीस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, शहर प्रमुख दिलीप सातपुते, समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, बाळासाहेब भुजबळ, राजेश सटाणकर, बाबासाहेब पटवेकर, जालिंदर बोरुडे आदि उपस्थित होते.


     याप्रसंगी दत्ता जाधव म्हणाले, आपल्या संत आपले जीवन सुखी होण्यासाठी बरेच काही देऊन गेले आहेत, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. संत साहित्यातूनच आपले जीवन सुखी-समाधानी होऊ शकते. श्री संत सावता महाराजांनी आपल्या कामातून ईश्वराला प्रसन्न केले. आपले कर्मच आपले भविष्य असते, त्यामुळे जीवनात आपण चांगले काम करुन संतांचे विचार जीवनात आचारले पाहिजे, असे सांगितले. जाहिरात
Search
विडिओ
Recent News