कारखाना निरीक्षकांचे कार्यालय हे कन्सलटंटच्या विळख्यात.....डॉ. कैलास कदम


कारखाना निरीक्षकांचे कार्यालय हे कन्सलटंटच्या विळख्यात.....डॉ. कैलास कदम

औद्योगिक सुरक्षा, भविष्य निर्वाहनिधी, इएसआय हि कार्यालये भ्रष्टाचाराने पोखरली.....अजित अभ्यंकर

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी

पिंपरी, पुणे (दि. 5 ऑगस्ट 2021) पिंपरी चिंचवड मधिल कारखाना निरीक्षकांचे कार्यालय हे कन्सलटंट माफीयांच्या विळख्यात अडकले आहे. कामगारांचे कायदेशीर हक्क डावलून कारखाना मालकांना फायदेशीर ठरतील यासाठी लाखो रुपयांची लाच खाऊन काम करणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करावी. तसेच या कार्यालयात होणा-या सर्व नोंदी सार्वजनिक कराव्यात अशी मागणी पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

      कन्सलटंटच्या विळख्यात अडकलेल्या चिंचवड येथिल औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यालयाबाहेर कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने बुधवारी (दि. 4 ऑगस्ट) डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, किशोर पवार, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर तसेच मनोहर गडेकर, नीरज कडू, भारती घाग, गणेश दराडे, अपर्णा दराडे, तूकाराम साळवे, स्वप्निल जेवळे, संतोष पवार, विजय राणे, सुरेश संधूर, नवनाथ जगताप, अमोल पाटील, शांताराम कदम आदी उपस्थित होते.

       ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर म्हणाले की, औद्योगिक सुरक्षा, भविष्य निर्वाह निधी, कामगार खाते, इएसआय हि सर्व कार्यालये भ्रष्टाचाराने पोखरली आहेत. उरावडे येथिल एसव्हीएस कारखान्याला मागची तारीख टाकून परवाना कोणी आणि का दिला ? या कारखान्यातील आगीत मृत्यू पावलेल्या कामगारांची 5 ते 7 वर्षांची सेवा लाच घेऊन कमी का दाखविली ? जे 17 कामगार जळून खाक झाले याला औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यालयातील अधिकारीच जबाबदार आहेत ? या सर्व कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची लाचलुचपत खात्याकडून चौकशी करावी तसेच त्यांचे निवृत्ती वेतन, बढत्या रोखावे, त्यांना निलंबित करावे अशीहि मागणी कामगारांची आहे असे कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर म्हणाले.    

       ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर म्हणाले की, पिंपरी चिंचवड भोसरी औद्योगिक पट्ट्यातील शेकडो कारखान्यांमध्ये वीस पेक्षा जास्त कामगार आहेत. ज्या कारखान्यांना परवाना दिला जातो तेथिल कामगारांची सुरक्षा, कामाचे तास, त्यांचे वेतन, सुट्या, आरोग्याच्या सुविधा, भत्ते इत्यादिबाबत मालक वर्गाकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. याबाबत निरीक्षक साधी विचारणा देखिल करीत नाहीत. प्रत्यक्ष कारखान्यात भेट न देता मालकांना अनुकूल ठरेल असा शेरा मारण्यासाठी कारखाना निरीक्षक लाखो रुपयांची लाच कन्सलटंट मार्फत घेऊन कामगारांना सामाजिक, आर्थिक अस्थिरतेच्या खाईत लोटतात. अशा कामचुकार आणि भ्रष्टाचारी अधिका-यांवर केंद्रिय कामगार मंत्रालयाने कडक कारवाई करावी अशीहि मागणी ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News