शोषण करणा-या प्रवृत्तींच्या विरोधात एकजूटीने लढा.....पोलिस उपायुक्त सुधिर हिरेमठ


शोषण करणा-या प्रवृत्तींच्या विरोधात एकजूटीने लढा.....पोलिस उपायुक्त सुधिर हिरेमठ

हक्क व विकासासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय.....पोलिस उपायुक्त मंचक इप्पर

सफाई सेवक महिलांनी केला पोलिस अधिका-यांचा गौरव


विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी


पिंपरी (दि. 6 ऑगस्ट 2021) संघर्षातून मिळालेल्या ताकतीने माणूस घडत असतो. सर्व सामान्यांचे शोषण करणा-या प्रवृत्तींच्या विरोधात आपण एकजूटीने लढून समाजातील दारिद्र्य व विषमतेवर विजय मिळवू शकतो. ब्रिटीशांविरुध्द लढत असताना आण्णाभाऊ साठे जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, धर्म व्यवस्थेविरुध्द लढत होते. त्यांचा आदर्श ठेवून आपण समाजात समानता निर्माण करु शकतो असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त सुधिर हिरेमठ यांनी केले.

       पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सफाई ठेकेदार सफाई सेवकांचे आर्थिक शोषण करतात. याबाबत सफाई सेवक महिलांनी अजिज शेख आणि सचिन वाघमारे यांच्या समवेत पोलिसांकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन पोलिस प्रशासनाने ताबडतोब कायदेशीर कारवाई केली. संबंधित महिलांना त्यांचे पासबुक व एटीएम अठरा वर्षांपासून ठेकेदार देत नव्हते. पोलिसांनी मात्र काही तासातच ते मिळवून दिले. यानिमित्त या सफाई सेवक महिलांनी लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोलिस अधिका-यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता.  

      गुरुवारी (दि. 5 ऑगस्ट) पिंपरीत आरपीआयच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सीमाताई आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआय वाहतुक कष्टकरी कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिज शेख आणि प्रदेश कार्याध्यक्ष सचिन वाघमारे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आरपीआय (आठवले गट) महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, अल्पसंख्यांक आरपीआय (आठवले गट) महाराष्ट्र उपाध्यक्ष खाजाभाई शेख, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष रामभाऊ बनसोडे, वाहतुक आघाडी महिला शहराध्यक्षा सलमा सैय्यद, शहर वाहतूक आघाडीचे नितीन येडे, आरपीआय शहर युवक अध्यक्ष कुणाल वाव्हळकर, धनंजय पानसरे, सनी गाडेकर, बशिर सैय्यद आदी उपस्थित होते.

        पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त सुधिर हिरेमठ पुढे म्हणाले की, लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मिळालेल्या या पुरस्काराने पोलिस प्रशासनाला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. आम्हाला मिळालेला पुरस्कार कष्ट करुन पुढे येणा-या माता भगिनींचा गौरव आहे. सर्व सामान्यांचे शोषण करणा-या प्रवृत्तीविरोधात आपण पुढे येऊन पोलिस प्रशासनाशी संपर्क करावा. पोलिस नक्कीच त्याचे दखल घेतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सफाई ठेकेदार सफाई सेवकांचे एटीएम आणि बँक पासबुक मागील अठरा वर्षांपासून देत नव्हते. याबाबतची तक्रार येताच पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तातडीने आदेश दिले. ताबडतोब गुन्हा दाखल त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरु आहे. हे एकजूटीने पुढे येणा-या महिला भगिनींचे यश आहे असेही हिरेमठ म्हणाले.

       पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यावेळी म्हणाले की, आपला हक्क व विकासासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. समाजातील जातीयता संपुष्ठात येण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. शिका, संघर्ष करा, संघटीत व्हा ही शिकवण आपल्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून समाज प्रबोधन केले असेही मंचक इप्पर म्हणाले.

सफाई सेवक सलमा सैय्यद, निर्मला गायकवाड, पौर्णिमा साळवे, कुसूम जाधव, अर्चना सोनी, प्रतिभा हाडमोडे यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या संयोजनात निर्माला दिलीप गायकवाड, पौर्णिमा शेखर साळवे, प्रतिभा किशोर हाडमोडे, कुसूम जाधव, आर्चना सोनी, आकाश दुनघव, जंब्बाया देवकर, अजय तेलंग, गोपी देवकर, दत्तात्रय गायकवाड, मंगेश गायकवाड, ऋषीकेश भिंगारदिवे, अतिश सोनवणे आदींनी संयोजनात भाग घेतला होता.

प्रास्ताविक, स्वागत अजिज शेख, सुत्रसंचालन सनिच वाघमारे आणि आभार सनी गाडेकर यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News