दौंड नगरपालिकेत दोन गट नेते एकत्र,सभा आणि विकास कामे होत नसल्यामुळे काम बंद आंदोलन


दौंड नगरपालिकेत दोन गट नेते एकत्र,सभा आणि विकास कामे होत नसल्यामुळे काम बंद आंदोलन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : 


दौंड नगरपालिकेत नक्की काय चालले आहे हे जनतेला कळेनासे झाले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते बादशाह शेख आणि सत्ताधारी नागरी हित सरंक्षण मंडळाचे गटनेते राजेश गायकवाड हे दोन गटनेते एकत्र येऊन नगरपालिकेच्या ढिम्म कारभारात होत असलेल्या दिरंगाई विरोधात काम आंदोलन सुरू केले आहे, या  आंदोलनात त्यांच्याबरोबर इंद्रजित जगदाळे,विलास शितोळे,जीवराज पवार आणि इतर नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व मित्र पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत,त्यांचे म्हणणे आहे की दौंड च्या नगराध्यक्षा शितल कटारिया मनमानी पद्धतीने व आडमुठे पणाच्या धोरणाने कामकाज करीत आहेत, नगरसेवकांनी वारंवार विनंती करूनही नगराध्यक्ष स्थायी समिती व सर्वसाधारण सभा घेण्यास तयार नाही, ज्यामुळे शहरातील कोट्यवधींची विकास कामे रखडवली आहेत. नगराध्यक्ष यांच्या या आडमुठे धोरणा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते बादशहा शेख व सत्ताधारी गटाचे गटनेते राजेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली  दिनांक 6 ऑगस्ट रोजी पासून नगरपालिकेला काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे,सदरचे आंदोलन जोपर्यंत नगराध्यक्ष सभा बोलवीत नाहीत तोपर्यंत बेमुदत करणार असल्याचे बादशहा शेख यांनी या वेळी सांगितले. नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला, दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. च्या सुमारास आंदोलनकर्ते नगरसेवकांनी नगरपालिकेचा ताबा घेतला. मुख्य प्रवेश द्वारा समोरच नगरपालिकेचे कामकाज बंद आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी, सभा न घेता दौंड शहराचा विकास वेठीस धरणाऱ्या नगराध्यक्षांचा निषेध असो, नगराध्यक्ष हाय -हाय अशा घोषणा देण्यात आल्या. मागास वर्गीय समाज वेठीस रहावा या दृष्ट हेतूने नगराध्यक्ष कामकाज करीत असल्याचा आरोप उपस्थित नगरसेवकांनी केला. नगर पालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारा समोरच आंदोलन सुरू असल्याने नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी नगरपालिकेच्या खाली हतबल होऊन थांबले होते व जे नागरिक कामानिमित्त नगरपालिकेत आले होते त्यांना नाईलाजास्तव कामा विनाच घरी परतावे लागले. मागील चार साडेचार वर्ष दोन्ही गटाचे कामकाज गुण्या गोविंदाने चालत आले होते. परंतु शेवटच्या अंतिम टप्प्यात नेमकी माशी कोठे शिंकली कोणास ठाऊक, दोन्ही गटाचे संबंध कमालीचे ताणले गेल्याचे दिसते आहे.  मात्र याचा फटका दौंडकर नागरिकांनाच सहन करावा लागत आहे हे नक्की.सत्तेतील दोन नगरसेवक आणि  विरोधकांच्या या आंदोलनाला आता नागरिक हित संरक्षण मंडळाचे पदाधिकारी काय प्रत्युत्तर देतात की उरलेल्या कालावधी मध्ये विकास कामांचा धडाकाच लावतात, याकडे दौंड करांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News