सायंबाच्यावाडीला शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार


सायंबाच्यावाडीला शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सायंबाचीवाडी (ता.बारामती) या गावाला २०१९-२० यावर्षीचा बारामती तालुक्यामधील शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार नुकताच जाहीर झाला. 

  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व गावातील वाड्या वस्त्या समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या वतीने ही योजना राबवण्यात आली आहे. बारामती तालुक्यातील जिरायत पट्ट्यातील गाव अशी या सायंबाचीवडीची ओळख, परंतु पाणी फाउंडेशनच्या कामानंतर या गावाने कृषी क्षेत्रात चांगलीच भरारी घेतली. अनेक ग्रामस्थ इतरांच्या शेतीत मजूर म्हणून काम करण्याऐवजी स्वतःच्या शेतीत काम करू लागले आहेत त्यामुळे शेतातील उत्पन्न वाढून आर्थिक प्रगती होऊ लागली आहे.

    हा पुरस्कार पंचायत समिती सभापती नीताताई फरांदे, उपसभापती रोहित कोकरे, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्या हस्ते देण्यात आला.

  यावेळी सरपंच हनुमंत भगत, उपसरपंच प्रमोद जगताप, ग्रामपंचायत आजी माजी सदस्य तसेच ग्रामसेवक अजित जाधव, गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

सायंबाचीवाडी गावाला पुरस्कार मिळाला त्यामागे गावातील सर्व नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली कामे या योजनेसाठी फायदेशीर ठरली असे मत यावेळी सरपंच भगत यांनी व्यक्त केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News