सन 2021 मधील आरोग्य विभाग वर्ग 3 कर्मचारी यांच्या मागण्या मान्य न करता अन्यायकारक बदल्या केल्यास आमरण उपोषण नोटीस


सन 2021 मधील आरोग्य विभाग वर्ग 3 कर्मचारी यांच्या मागण्या मान्य न करता अन्यायकारक बदल्या केल्यास आमरण उपोषण नोटीस

पुणे: अधिपरिचारिका हा अत्यावश्यक सेवेचा महत्त्वाचा भाग असून प्रशासकीय बदल्या मध्ये 1 रिक्त पदे असताना देखील पदस्थापना नाकारण्यात येते. कारण सांगण्यात येते कोणतेही शासन निर्णय नसताना मुख्यालय चे मुख्यालय बदली देण्यात येणार नाही.

पुण्यातील संस्थांमधील अधिपरिचारिका यांची पदे रिक्त ठेवून ग्रामीण भागात पदस्थापना देण्यात येते.

ग्रामीण भागातील च्या अधि परिचारिकांना कुशहरी भागात पदस्थापना आवश्यक आहे. त्यांना प्राधान्य देऊन शहरी भागात रिक्त पदावर उर्वरित रिक्त ठिकाणी जेष्ठतेनुसार पदस्थापना देण्यात यावी वर्ग 1 वर्ग 4 यांना मुख्यालय चे मुख्यालय हा नियम नाही त्यामुळे त्यांना बदली मध्ये पदस्थापना देण्यात येते.

तर वर्ग  3 वर हा अन्याय का? तरी कुटुंबासाठी समाज दोन्हीही विस्कळीत न होता. महिलांचा प्राधान्याने विचार करण्यात येऊन वर्ग 3 ची  विनंती मान्य करण्यात यावी .

अशी मागणी आरोग्य कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य चे राज्य समन्वयक रविंद्र मल्‍हारी पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेला आरोग्य कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य च्या संघटक वैशाली गुरव, शार्दुल काळे, भानुसे लक्ष्मी उपस्थित होते. रविंद्र पाटील म्हणाले,आम्ही अर्चना पाटील मॅडम संचालक पुणे यांना निवेदन सादर केले आहे.

मात्र उपरही वरील मुद्द्यांचा मागणीचा विचार न करता अन्यायकारक बदली आदेश काढलेत आम्हा सर्व अन्यायग्रस्त कर्मचारी यांच्या वतीने हा अन्याय दूर करण्यासाठी दिनांक 10.8.2021 रोजी सकाळी दहा वाजता संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.

आरोग्य कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य च्या मागण्या

1) शासकीय कर्मचारी यांच्या बदल्या ह्या बदली अधिनियम 2005 अन्यवेच करणे शासनास बंधनकारक असून सदर अधिनियमानुसार बदलीपात्र कर्मचारी यांच्या प्रशासकीय बदल्या 31 मे पूर्वीच  करणे बंधनकारक असताना या बदल्या ऑगस्टमध्ये करणे हे कर्मचारी यांच्यावर अन्याय कारक आहे  मात्र कोविंड परिस्थितीचा विचार करता यासआम्ही कसलाही विरोध दर्शवला नाही.

2) सध्याची  कोविड मुळे अत्यल्प सार्वजनिक वाहतूक साधने ,पावसाचे दिवस रुग्णालयातील कामाचे व्यवस्थेचा विचार करता  समुपदेशक करिता कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष न बोलविता मीटिंग सारख्या याद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समुपदेशन प्रक्रिया राबविण्याची विनंती केली असता त्याकडे लक्ष दिले नाही.

3) सदर बदल्या करताना नागरी सेवा मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या समुपदेशन प्रकियेच्या मार्गदर्शक सूचना मध्ये अनेक त्रुटी व क्लिष्टता होत्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News