बहुतांश भागात सध्या पावसाची विश्रांती


बहुतांश भागात सध्या पावसाची विश्रांती

पुणे: राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली. तरी कोकण, आणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम आहे मात्र येत्या एक दोन दिवसात या भागातही पाऊस विश्रांती घेणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे .पुढील चार ते पाच दिवस कुठे जोरदार पावसाची शक्यता नाही.

तुरळक ठिकाणीच केवळ हलक्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. पहिल्या दोन महिन्यांमध्ये राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. जुलै मध्ये पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये पावसाने धुमाकूळ घातला.

या दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहिल्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद झाली मराठवाड्यातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

पुढील दोन महिन्याच्या कालावधीतही कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार तर राज्यात इतरत्रही सर्वसाधारण पाऊस पाण्याचा हवामान विभागाचा अंदाज असला .तरी पुढील काही दिवस पाऊस कमी प्रमाणात पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे .

कोकण ,आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणखी 1 ते 2 दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. 7 ऑगस्ट नंतर सर्वच ठिकाणी पाऊस कमी होणार आहे.कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी 8 ऑगस्टला जोरदार पावसाची शक्यता आहे. 7 ऑगस्टनंतर कोकणात सर्वच ठिकाणी पाऊस कमी होईल असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News