पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 139 रुग्णांना डिस्चार्ज तर 244 नवीन रुग्णांची नोंद


पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 139 रुग्णांना डिस्चार्ज तर 244 नवीन रुग्णांची नोंद

पुणे:पुणे शहरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी होत आहे.आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत  आलीआहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची  संख्या  पण कमी होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 244नवीन रुग्णांची  नोंद झाली आहे. तर 139रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 88हजार 293 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख77  हजार048इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 17रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील11तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 6रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8797जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरामध्ये सध्या 2448अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 209रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8469 स्वॅब  तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News