श्री क्षेत्र भीमाशंकर येथील श्रावणी यात्रा या ही वर्षी रद्द


श्री क्षेत्र भीमाशंकर येथील श्रावणी यात्रा या ही वर्षी रद्द

विलास काळे, घोडेगाव प्रतिनिधी

बारा ज्योतिलिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर मध्ये दरवर्षी मोठया उत्साहात होणारी श्रावणी सोमवार यात्रा यंदाच्या वर्षीही रद्द करण्यात आली आहे. कोणीही श्रावण महिन्यात भीमाशंकरकडे येऊ नये असे अवाहन देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.सुरेश कौदरे यांनी केले आहे.

     दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे लाखोच्या संख्येने देश भरातून भाविक  येत असतात परंतु याही वर्षी कोरोनाचा पादुर्भाव पाहता किंवा येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा संभाविक धोका पाहता भीमाशंकरकडे भाविक व पर्यटक जाऊ नयेत यासाठी पालखेवाडी चेकपोस्ट , डिंभे नाका याठिकाणी चोविसतास कर्मचारी नेमले जाणार आहेत. श्रावण महिन्यात भीमाशंकर मध्ये गर्दि होणार नाही याची पुर्ण दक्षता घेतली जाणार आहे. कोणीही शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्या नुसार दंडात्मक कारवाई केली जाईल असे घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी सांगितले आहे.

   यावर्षी दि.९ ऑगस्ट ते ७ सष्टेंबर दरम्यान श्रावण महिना येत असून यामध्ये दि.९, १६, २३, ३० ऑगस्ट व ६ सष्टेंबर असे पाच श्रावणी सोमवार आले आहेत.भीमाशंकर मधिल श्रावण महिन्याची यात्रा पुरातन काळापासून सुरू आहे. श्रावण महिन्यात भीमाशंकरचे दर्शन पवित्र मानले जात असल्याने पुर्ण एक महिना दर्शनासाठी मोठया संख्येने भाविक येतात. या यात्रेचे नियोजन प्रशासन व भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट करत असते.

मात्र कोरोनाची लाट अजूनही गेली नसल्याने भीमाशंकर व परिसरातील पर्यटनस्थळांवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील धार्मिकस्थळे सुरू करण्याबाबत राज्य सरकारने अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे यावर्षी भीमाशंकर मधिल श्रावणी सोमवार यात्रा होणार नाही असे आंबेगावचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.

   कोरोना महामारी मुळे सुमारे एक वर्षापासून सर्व धार्मिकस्थळे बंद आहेत. श्रावण महिना म्हणजे हिंदू संस्कृती मधील एक पवित्र महिना पण या संकटाच्या काळात भाविकांना भीमाशंकरच्या दर्शना पासून दुर रहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव अजूनही संपलेला नाही, तज्ञांनी तिस-या लाटेचे भाकित वर्तवले आहे तरी भाविकांनी देवस्थानला सहकार्य करून घरातून भगवान शंकराची  पुजा व अराधाना करावी भीमाशंकर कडे येणे टाळावे व देवस्थानला सहकार्य करावे असे अवाहन अ‍ॅड.सुरेश कौदरे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News