मातंग समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्ना बाबत त्वरित कार्यवाही व्हावी- अँड.नितीन पोळ


मातंग समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्ना बाबत त्वरित कार्यवाही व्हावी- अँड.नितीन पोळ

राजेंद्र तासकर कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव. गेल्या अनेक दिवसांपासून मातंग समाजाचे अनेक शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक प्रश्न प्रलंबित असून गेल्या एक ते दिड वर्षांपासून लॉक डाऊन असल्यामुळे मातंग समाजाच्या विविध प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे विशेष आदेश देऊन मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी  कार्यवाही व्हावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

    आपल्या निवेदनात नितिन पोळ पुढे म्हणाले की ,मातंग समाजाचे विविध शैक्षणिक,सामाजिक,

आर्थिक प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत मात्र त्यांच्या प्रश्नाकडे सरकार गांभीर्याने पहात नाही त्यामुळे आपण स्वतःहून मातंग समाजाच्या खालील प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते सोडविणे कामी विशेष आदेश करावेत

 आपल्या निवेदनात पोळ यांनी दिलेल्या मागण्या  पुढीलप्रमाणे  १ )एन एस एफ डी सी ची 100 कोटी थकबाकी महाराष्ट्र सरकार भरत नसल्याने अण्णाभाऊ साठे महामंडळ बंद अवस्थेत आहे.त्यामुळे कर्ज पुरवठा बंद आहे.

२) लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या मंजूर 68 शिफारशी धूळ खात पडून आहे.या शिफारशींची खातेनिहाय अंमलबजावणी करा.

३) राज्यातील सर्व विद्यापीठात अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र तात्काळ सुरू  करा.

४) S Cआरक्षण वर्गीकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा.

५) अनुशेष भरतीमध्ये मातंग,मांगगारुडी,होलार,राधेमांग,मादगी,गारोडी मांग व तत्सम आरक्षण लाभवंचित जातीच्या उमेदवारांना विशेष संधी द्या.

६)बेरोजगार यांना दरमहा 9000 हजार भत्ता व शेतमजूर यांना 6000 आर्थिक मदत करा.

७) लॉक डाऊन मुले कलावंत, बॅंडबाजा वादक यांच्या वर उपासमारीची वेळ आली असून त्यांना प्रत्येक कलापथकास किमान 3 लाख रूपये द्या.

८)सर्व खाजगी शाळांकडून वसूल करण्यात येत असलेली फिस पूर्ण पणे माफ करा.

९)सर्व मागासवर्गीय आर्थिक विकास महा

महामंडळाचे कर्ज माफ करा.

वरील सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्वरित कार्यवाही व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News