दौंड शहरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वेळोवेळी माहिती देऊन ही दखल घेतली जात नसल्याची व्यपाऱ्यांची खंत


दौंड शहरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वेळोवेळी माहिती देऊन ही दखल घेतली जात नसल्याची व्यपाऱ्यांची खंत

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

कोविड 19 मुळे नागरिक,व्यापारी त्रस्त झाले असताना सुविधा मिळण्या ऐवजी  घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे,प्रत्येक ठिकाणच्या कचरा कुंड्या भरून जाऊन कचरा खाली सांडत आहे आणि त्यामुळे मोकाट जनावरे त्याठिकाणी जमा होत आहेत, त्यांच्या मध्ये झालेल्या टकरी मुळे दुचाकीस्वरांचे अपघात होत आहेत,दौंड शहरातील मुख्य बाजारपेठ 1छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा गांधी चौक या दरम्यान रुपी बँके शेजारी एक कचरा कुंडी आणि त्यापलीकडे दौंड शहरातील एकमेव शौचालय आहे,त्याची दुर्गंधी त्या संपूर्ण परिसरात येत असल्यामुळे त्या ठिकाणी ग्राहक येण्यास टाळाटाळ करीत आहेत, आणि जे येतात त्यांना तोंडाला रुमाल बांधून यावे लागते,येथील व्यापाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की आम्ही याबाबत सविस्तर नगरपालिका प्रशासन यांना कित्येक वेळा निवेदन दिले आहे,परंतू परिस्थिती जैसे थे आहे,कोणीही या शौचालयाची दखल घेत नाही, रोजचा त्रास सर्वच व्यपाऱ्यांना होत आहे, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे, तीच परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे,महालक्ष्मी हॉस्पिटल जवळ दोन कचरा कुंड्या आहेत तेथे 35 ते 40 जनावरे,कुत्रे रोज गोळा होतात,महिला दुचाकी स्वरांचे याठिकाणी अपघात झाले आहेत, सरपंच वस्ती गजानन सोसायटी येथेही तीच परिस्थिती आहे, लोकांना कोरोना पासून वाचवण्यासाठी मागणी करण्या ऐवजी आम्हाला घाणीपासून वाचवा अशी म्हणण्याची वेळ दौंडकरांवर आली आहे,ही दुर्दैवी बाब आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News