वाघ्या मुरळी गोंधळी समाजावर उपासमारीची वेळ,मानधन आणि मुलांच्या शिक्षणासाठी सरकार कडून मदतीची अपेक्षा-- प्रविण गरुडकर


वाघ्या मुरळी गोंधळी समाजावर उपासमारीची वेळ,मानधन आणि मुलांच्या शिक्षणासाठी सरकार कडून मदतीची अपेक्षा-- प्रविण गरुडकर

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

कोरोना महामारीने सर्वच छोटे मोठे व्यापारी, नागरिक यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे, तसेच लोककलावंत तमाशा कलावंत यांचे खूपच हाल झाले आहेत, वाघ्या मुरळी गोंधळी यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे असे मत वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य दौंड तालुका अध्यक्ष प्रविण गरूडकर गोंधळी यांनी व्यक्त केले आहे, ते पुढे म्हणाले कोरोनामुळे सर्वच समारंभ,घरगूती कार्यक्रम रद्द झाले असल्यामुळे आमचे पिढ्यानपिढ्याचे कलेच्या माध्यमातून धर्मजागरण,कुळधर्म, कुळाचार पालन,समाज प्रबोधन करून लोकांची सेवा करण्याचा व्यवसाय आहे, आणि या कोरोनामुळे आमचा पारंपरिक व्यवसाय बंद पडले आहेत, त्यामुळे आमच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, सध्या आम्ही मिळेल ते काम करून जे आम्ही कधीही केले नाही अशी कामे उदरनिर्वाह साठी करण्याची वेळ आली आहे,तरी वाघ्या मुरुळी कलावंतांना उदरनिर्वाह साठी विशेष निधी अनुदान स्वरूपात सुरु करावा,आमच्या मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनामार्फत व्हावा,वाघ्या मुरुळी कलावंतांना शासन दरबारी अधिकृत मान्यता मिळून नोंदणी करावी,या कलावंतांना निवासासाठी शासनाकडून जमीन घर या स्वरूपात विशेष योजना सुरू करण्यात याव्यात,नियमांचे पालन करून कलावंतांना सेवा करण्याची परवानगी मिळावी अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे वाघ्या मुरुळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मार्तंड साठे आणि तालुका अध्यक्ष प्रविण गोंधळी यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News