कर्जत तालुक्यातील निमगाव डाकु येथील धाकोजी महाराज विद्यालयातील अत्याधुनिक व्यायामशाळेचे आ. रोहित पवारांच्या हस्ते लोकार्पण


कर्जत तालुक्यातील निमगाव डाकु येथील धाकोजी महाराज विद्यालयातील अत्याधुनिक व्यायामशाळेचे आ. रोहित पवारांच्या हस्ते लोकार्पण

कर्जत प्रतिनिधी - मोतीराम शिंदे - विद्यार्थ्यानी स्वप्न पाहिले पाहिजे. आणि विद्यार्थिनींनी ते पूर्ण करण्यासाठी याच काळात कठोर मेहनत घ्यावी. कारण हे स्वप्न तुमचे नसून तुमच्या सर्व कुटुंबाचे भवितव्य आहे. त्यामुळे मोठी स्वप्न पहा आणि ती सत्यात उतरविण्या साठी कठोर प्रयत्न करा असे आवाहन आ रोहित पवार यांनी केले . पवार म्हणाले की कोरोनाचा काळ संपल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद शाळेत तारांगण प्रकल्प उभारण्याचा मानस असून . जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना  शहरी भागातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्याची जिद्द मिळणार आहे . हे कामे करीत असताना आम्ही पवार आहोत. नुसते शब्द देत नाहीत तर ते पूर्ण करण्यासाठी कायम तत्पर असतो असे प्रतिपादन आ रोहित पवार यांनी केले. ते  जिल्हा क्रीडा अधिकारी अहमदनगर यांच्या मान्यते अंतर्गत धाकोजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव डाकूच्या प्रांगणातील नऊ लाख रुपये खर्चून उभारलेल्या अत्याधुनिक व्यायाम शाळेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी विश्वकर्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रसाद ढोकरीकर, कर्जत पंचायत समितीच्या सभापती मनीषा जाधव, उपसभापती राजेंद्र गुंड, गटविकास अधिकारी अमोल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, माजी सभापती नानासाहेब निकत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. विशाल मेहेत्रे, सरपंच शंकर शेंडकर आदी उपस्थित होते. 

      यावेळी  बोलताना आ पवार म्हणाले की, आपण शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना कधीच राजकारण करीत नाही. प्रसाद ढोकरीकर यांनी व्यायाम शाळेच्या उदघाटनसाठी आमंत्रण दिले आणि मी ते  तात्काळ स्वीकारले.  या विद्यालयाचे अध्यक्ष प्रसाद ढोकरीकर यांनी विद्यार्थ्यांना सुसज्ज अशी व्यायामशाळा उपलब्ध करून दिली आहे याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेऊन आपले शरीर निरोगी बनवले पाहिजे असे आवाहन केले. पुढे बोलताना पवार म्हणाले की आमदार झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण विद्यार्थ्यांसाठी कर्जतच्या एसटी डेपोचा प्रश्न मार्गी लावला. जेणेकरून बस अभावी कोणाचे शिक्षण थांबणार नाही याची दक्षता घेतली. यासह कोरोना काळात कोणाच्या शिक्षणात खंड पडणार नाही यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध केला. विद्यार्थी वर्गातील शैक्षणिक प्रगती निश्चित या काळात थंडावली असेल मात्र शिक्षकांनी आणखी मेहनत घेतल्यास निश्चित ती प्रगती भरून निघेल यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन केले. 

            याप्रसंगी बोलताना विश्वकर्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रसाद ढोकरीकर म्हणाले की, तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ब्रीद वाक्याने विद्यालयातील विद्यार्थी घडत आहे. आ रोहित पवार यांनी फक्त मतदारसंघातच कार्य न करता ते संपूर्ण महाराष्ट्रात मदतकार्य करून आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे. आज शाळेत अद्यावत व्यायामशाळा विद्यार्थीसाठी उपलब्ध केली आहे. भविष्यात याच व्यायामशाळेतून खेळाडू, तयार होतील आणि अधिकारी म्हणून पुढे येतील असा विश्वास ढोकरीकर यांनी व्यक्त केला. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र गुंड, सभापती मनीषा जाधव यांची भाषणे झाली. यावेळी कोरोना काळात निमगाव डाकू येथे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोरोना योध्द्यांचा धाकोजी विद्यालयाच्यावतीने सन्मान करण्यात आला. 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्रीपाद आडकर यांनी केले तर आभार प्राचार्य कय्युम मोमीन यांनी मानले. या कार्यक्रमास दिलीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य गणेश शेंडकर, अंकुश भांडवलकर, भाऊसाहेब कदम, सिद्धार्थ धावडे, दत्ता भांडवलकर, ईश्वर कोठावळे, बबनभाऊ नेवसे, इकबाल काझी, सोशल मिडियाचे दीपक यादव, नानासाहेब आरडे, भाऊसाहेब कदम, हरिभाऊ शेंडकर, स्वप्नील काटे आदी मान्यवर उपस्थित होते. 


चौकट - "धाकोजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने राज्यातील पूरग्रस्तांसाठी ११ हजार रुपयांची मदत आ पवार यांच्या हस्ते तहसीलदारांकडे सुपूर्त करण्यात आली. 

       महाराष्ट्रातील नुकत्याच  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रायगड, चिपळूण, सांगली, कोल्हापूर येथील नद्यांना  आलेल्या महा पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे सामाजिक भान ठेवून  धाकोजी महाराज विद्यालयाच्या वतीने ११ हजार रुपयांची मदत विद्यालयाचे प्राचार्य कय्युम मोमीन आणि उपस्थित शिक्षकांच्या हस्ते पूरग्रस्तांसाठी आ रोहित पवार आणि गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News