कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराजांची रथ यात्रा मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने साजरी .


कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराजांची रथ यात्रा मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने साजरी .

कर्जत प्रतिनिधी - दि ४ रोजी 

रोजी कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराजांचा  रथोत्सव मोजक्याच पुजारी, मानकरी, आणि सेवेकरी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. दुसऱ्या वर्षी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संत गोदड महाराजांची  साजरी होणारी रथयात्रा  प्रशासनाने रद्द केली होती . मात्र रीती-रिवाज आणि पारंपरिक पद्धतीने मर्यादित लोकसंख्येला परवानगी देत  प्रशासनाच्या नियमानुसार सकाळी अभिषेक, पुजा पार पडली. यासह रिती रिवाजा प्रमाणे पाच पावले महाराजाचा रथ देखील ओढण्यात आला. यावेळी माजी मंत्री प्रा राम शिंदे, आ. रोहित पवार यांनी देखील महाराजांच्या रथाचा दोर आपल्या हाती घेत  रथ ओढला. 

   धाकटी पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या कर्जतची यात्रा   दरवर्षीप्रमाणे कामीका एकादशी दिवशी कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराजांची रथ यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते . मात्र मागील वर्षीपासून दोन वर्षापासून  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रथोत्सव रद्द करण्यात आला. मात्र गावाच्या परंपरे अनुसार मोजक्याच पुजारी, मानकरी आणि सेवेकरी यांच्या उपस्थितीमध्ये रिती रिवाजा प्रमाणे गोदड महाराज यांच्या मंदीरात अभिषेक, पूजा करण्यात यावी याची मुभा प्रशासनाने दिली होती. त्या अनुषंगाने बुधवारी सकाळी संत सदगुरु गोदड महाराजांच्या मूर्तीस दुग्ध अभिषेक करण्यात आला. यासह नियमानुसार शासकीय महापुजा कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते पार पाडली. तदनंतर दुपारी ठीक १:०५ वाजता  पांडुरंगाची मूर्ती गोदड महाराजांच्या तीन मजली लाकडी रथामध्ये विराजमान करण्यात आली . यावेळी उपस्थित असणाऱ्या पुजारी, मानकरी, सेवेकरी आणि भजनी मंडळी यांनी काही पावले रथ ओढला . यानंतर ग्रामस्थांनी  प्रदक्षिणेसाठी सजविलेल्या (पिकअप जीप गाडीच्या) रथामध्ये तिन्ही मूर्ती विराजमान करीत अवघ्या २० मिनिटातच रथमार्गाने ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करीत मुर्ती पुन्हा मंदीरासमोर असणाऱ्या लाकडी रथात विराजमान केल्या. ग्राम प्रदक्षिणेनंतर शेवटी आरती करण्यात आली. यावेळी माजी मंत्री प्रा राम शिंदे आणि आ रोहित पवार यांनी संत सदगुरु गोदड महाराजांना पुष्पांहार आणि नारळाचे तोरण अर्पण करीत दर्शन घेतले. यावेळी दोन्ही नेत्यांनी कर्जत सह  देशाची  कोरोना महामारीपासून मुक्ती करावी. या वर्षी सर्वत्र  भरपुर पाऊस पडू दे. तसेच सर्वांना चांगले आरोग्यदायी आयुष्य लाभावे यासाठी संत सदगुरु गोदड महाराज चरणी प्रार्थना केली . यावेळी सर्व पुजारी, मानकरी, सेवेकरी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यात्रा कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गोदड महाराज मंदीर परिसरात आणि कर्जत शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, भगवान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया संख्येने पोलीस  प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. ग्राम प्रदक्षिणेसाठी सजविलेल्या पिकअप जीपच्या रथाचे सारथ्य रमेश तोरडमल यांनी केले. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील उत्तम समन्वयातुन हा रथोत्सव साजरा करण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News