" एक हात मदतीचा " कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली राष्ट्रवादी


" एक हात मदतीचा "  कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली राष्ट्रवादी

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

       एक हात मदतीचा" या संकल्पनेतून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप वसंत कंद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजेश वारघडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष योगेश शितोळे यांच्या विशेष पुढाकारातून वाडेबोल्हाई - पेरणे - लोणीकंद जिल्हा परिषद गटातील दानशूर व्यक्तींनी एकूण ५ लाख ३४ हजार रुपयांचा निधी शिरूर हवेलीचे आमदार ॲड्  अशोकबापू पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

         याप्रसंगी वाडेबोल्हाईचे माजी सरपंच कुशा गावडे, शिरसवडीचे माजी सरपंच संदीप गोते,पंचायत समितीच्या सदस्या संजीवनी कापरे,तुळापूरच्या सरपंच गुंफा इंगळे,माजी उपसरपंच संतोष शिवले, माजी सरपंच गणेश पुजारी,संदेश आव्हाळे,योगेश शिवले,माधुरी वाळके आदींसह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थिती होतें.

     पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वाडेबोल्हाई-पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटातील दानशूर व्यक्तींनी दिलेली मदत अमूल्य आहे. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार यावेळी शिरूर हवेलीचे आमदार ॲड् अशोकबापू पवार यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News