कुकडी भु-संपादित ९ गावांतील शेतकऱ्यांना ६१ कोटी ७८ लक्ष रुपयांचा मोबदला


कुकडी भु-संपादित ९ गावांतील शेतकऱ्यांना ६१ कोटी ७८ लक्ष रुपयांचा मोबदला

आ.रोहित पवारांचा यशस्वी पाठपुरावा; शेतकऱ्यांनी मानले  आ.पवार यांचे आभार

कर्जत प्रतिनिधी - मोतीराम शिंदे - कुकडी प्रकल्पासाठी भु-संपादित झालेल्या नऊ गावांतील शेतकऱ्यांना आ.रोहित पवार यांच्या हस्ते (दि.४ रोजी) तब्बल ६१ कोटी ७८ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.यामध्ये तालुक्यातील तळवडी, बेनवडी,कोळवडी,होलेवाडी,करमनवाडी,पिंपळवाडी,वडगाव तनपुरा,आळसुंदे, डोंबाळवाडी म्हाळंगी या गावांचा सामावेश आहे.कुकडी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे भू-संपादन झाले खरे, मात्र प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासून गेली २० वर्षांपासून शेतकऱ्यांना भु-संपादन मोबदल्याचे हक्काचे पैसे मिळाले नव्हते.कुकडीच्या लाभधारक शेतकऱ्यांना ना भु-संपादन मोबदला आणि ना हक्काचे पाणी मिळाले. मात्र आ.रोहित पवारांनी कुकडीचा अभ्यास करून कुकडीच्या पाण्याचे नियोजन करून घडी बसवली.शेतकऱ्यांकडून होत असलेल्या भू-संपादन मोबदल्याच्या मागणीसाठी  कर्जत,नगर, पुणे,मुंबई आदी ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन राज्यशासनाच्या दरबारीही त्यांनी ठाण मांडून हा विषय गांभीर्याने सोडवला.त्यांच्या याच परिश्रमामुळे शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे अडकून पडलेली रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना मिळाली आहे.आ.रोहित पवारांचे प्रयत्न आणि पाठपुराव्यातून कुकडी भू-संपादीत शेतकऱ्यांना आत्तापर्यंत ११६ कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे.कुकडीच्या अनियमित पाणी वाटपामुळे कुकडीच्या बुजलेल्या चाऱ्या,तुटलेले गेट,पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बुजवलेल्या पोटचाऱ्या,गाळ साठून नादुरुस्त झालेल्या चाऱ्या अशा ढिगभर अडचणींच्या भोवऱ्यात सापडलेल्या कुकडी प्रकल्पाला पुन्हा उभारी देणे आव्हानच होते.चाऱ्या दुरुस्ती,गेट दुरुस्ती अशी कामे मंजुर करून प्रसंगी स्वखर्चातूनही त्यांनी १२० किमी लांबीच्या चाऱ्या दुरुस्तीचा पल्ला गाठला आहे.२३७ गेट दुरुस्तीची कामे मार्गी लागली आहेत. सुमारे ३१ किमीच्या अस्तरीकरणाचे काम मार्गी लावण्यात त्यांना यश आले आहे.मागील टप्प्यात आ.पवारांच्या कार्यकालात सन २०१९-२० मध्ये ४९ कोटी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. यामध्ये जळकेवाडी,तळवडी,बारडगाव दगडी, येसवडी,राशीन, देशमुखवाडी,कोरेगाव आदी गावांचा समावेश होता.धनादेश वाटपानंतर ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या सांगण्यासाठी प्रत्येकाला संधी देण्यात आली व उपस्थित अधिकाऱ्यांना सांगून त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या सुचना आ.पवार यांनी दिल्या.आता ९ गावांसाठी मिळालेली भु-संपादनाची ६१ कोटी ७८ लक्ष ही रक्कम शेतकऱ्यांना सुखावणारी आहे. आ.रोहित पवार यांच्या या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.यावेळी शासकीय अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतकऱ्यांना विचारात घेऊनच पाण्याचे नियोजन!

    मोबदल्याचा पैसा जेंव्हा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हातात येतो तेंव्हा शेती व मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांची प्रगती साधली जाते. या भागातील व्यापार-उद्योगाला देखील मोठी चालना मिळते.ही रक्कम मिळवून देण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील व परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. पुढील काळात शेतकऱ्यांना विचारात घेऊनच पाण्याचे नियोजन होईल.

               -आ.रोहित पवार

माणुस शब्दाचा पक्का म्हणत शेतकऱ्यांनी केला आ.पवारांचा सत्कार! भु-संपादन मोबदल्याची वाट पाहण्यात शेतकऱ्यांनी आपले आयुष्य वेचले.दोन दशके उलटून गेली तरीही शेतकऱ्यांचे अश्रु कुणालाही पुसता आले नाहीत. आ.रोहित पवारांनी शब्द दिला आणि काही कालावधीतच मोबदल्याची भली मोठी रक्कम शेतकऱ्यांना मिळवून दिली.माणुस शब्दाचा पक्का म्हणत शेतकऱ्यांनी आ.पवारांचा सत्कार केला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News