कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आम्ही कर्जतकर प्रतिष्ठानचे शिलेदार


कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आम्ही कर्जतकर प्रतिष्ठानचे शिलेदार

कर्जत प्रतिनिधी - कोकणातील आपल्या बांधवांवर निसर्गाने अतिवृष्टीचा आघात केला त्या मुळे या भागातील अनेक नागरिकांना आपल्या संसारीक साहित्याला मुकावे लागले. म्हणून कोकणातील आपल्याच लोकांना मदत द्यावी या हेतूने कर्जत येथील आम्ही कर्जतकर प्रतिष्ठान च्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला असून यामध्ये पुरग्रस्तांच्या वेदना काही अंशी कमी करण्याचा आम्ही कर्जतकरचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते  प्रयत्न करत आहेत .तसेच पुरग्रस्त भागातील नागरिकांना  समस्त कर्जत करांनी मदत करण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले  होते. या आवाहनास प्रतिसाद देत मित्र परिवाराने मिळून कोकणातील कवठेगुलंद ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. यावेळी प्रतिष्ठानच्या माध्यमातून योगिराज शेलार, रोहन ढेरे, सुशांत कुलथे, आशुतोष देशमाने, हरिओम कुलथे, गोदड धांडे, रोहित धांडे, अमर दळवी, प्रशांत वायाळ, अभिषेक शिंदे, सज्जन पोकळे, प्रज्वल मनोत, सौरभ वाघचौडे आणि ओंकार धारूरकर या सर्वांनी मिळून तेथील घरो घरी जाऊन नुकसान ग्रस्त लोकांना साखर, फरसाण , मसाले, गहू, तांदूळ, गोडे तेल पॉकेट, टोस्ट, साबण, कोलगेट, बटर बिस्कीट पुडे, सॅनिटरी पॅड ,ब्लँकेट व पिण्याच्या पाण्याचे बॉक्स घरोघरी जाऊन वाटप केले. तसेच तेथील परिस्थितीचा आढावा ही या कार्यकर्त्यांनी घेतला. आणि हे मदतकार्य यापुढेही असेच चालूच राहणार असून आमच्या कोकणातील बांधवांचे संसार पुन्हा नव्याने उभारण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आम्ही कर्जतकर प्रतिष्ठानच्या वतीने करणार असल्याची माहिती मिळाली .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News