सर्व नियमांचे पालन करून हॉटेल व्यवसायिकांकडून हॉटेल सुरू.....हॉटेल उघडायला परवानगी द्यावी - युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशन मागणी


सर्व नियमांचे पालन करून हॉटेल व्यवसायिकांकडून हॉटेल सुरू.....हॉटेल उघडायला परवानगी द्यावी - युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशन मागणी

हॉटेल सुरू व्हावी म्हणून युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशन व व्यापारी महासंघाच्या वतीने पुण्यातील विविध ठिकाणी सरकारच्या विरोधात घंटानाद व थाळीनाद आंदोलन नुकतेच करण्यात होते. आज पुणे शहरात व उपनगरात मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायिकांनी हॉटेल उघडली होती. कोव्हिडच्या सर्व नियमांचे पालन करून हॉटेल सुरू ठेवली होती. हॉटेल बरोबर दुकाने देखील मोठ्या प्रमाणात उघडली होती. यावेळी असोसिएशनचे संदीप नारंग, समीर शेट्टी, दर्शन रावल, राहुल रामनाथ, यशराज शेट्टी, अक्षत शेट्टी, जीवनात चावला, यादी व्यापारी माहिती दिली.

 युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग  यावेळी बोलताना म्हणाले आज आम्ही व्यवसायिकांनी सर्व नियमांचे पालन करून आज आम्ही हॉटेल उघडली होती. मात्र आम्ही ग्राहकांना फक्त पार्सलच सेवा उपलब्ध करून दिली. आज रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही हॉटेल पुर्णपणे उघडली होती. युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशनचे खजिनदार समीर शेट्टी म्हणाले की सरकारकडे आमच्या मागण्या मान्य कराव्या . उत्पादन शुल्कात सवलत, एमएसईबी बिल, पाणी कर आणि मालमत्ता करात सवलत द्यावी. आमचा व्यवसाय दीड वर्षापासून बंद आहे. सरकारने आमचा विचारा करावा. हॉटेल उघडायला परवानगी द्यावी - युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशन मागणी केली आहे. परवानगी मिळाली नाहीतर भविष्यात मोठया प्रमाणात आंदोलन आम्ही करणार आहोत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News