आंबेगाव तालुक्यातील सहा धोकादायक गावांचे पुनर्वसन जेथे करावयाचे आहे तेथील जागा मालकांनी संमतीपत्र तहसिल कार्यालयात दयावीत.


आंबेगाव तालुक्यातील सहा धोकादायक गावांचे पुनर्वसन जेथे करावयाचे आहे तेथील जागा मालकांनी संमतीपत्र तहसिल कार्यालयात दयावीत.

विलास काळे, घोडेगाव प्रतिनिधी 

   आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील सहा धोकादायक असलेल्या गावांचे पुनर्वसन ज्या संबंधित जागा मालकांच्या जागेत करावयाचे आहे त्या संबंधित जागा मालकांचे व सहधारकांचे संमतीपत्र, ग्रामपंचायत ठराव व इतिवृत्त बुधवार (दि. ४) पर्यंत तहसिल कार्यालय घोडेगाव येथे दयावीत, अशी माहिती तहसिलदार रमा जोशी यांनी दिली.

आंबेगाव तालुका तहसिल कार्यालय घोडेगाव येथे सहा धोकादायक गावांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी रमा जोशी बोलत होत्या. यावेळी नायब तहसिलदार अनंता गवारी, सुनिल रोकडे, जांभोरी सरपंच संजय केंगले, माजी सरपंच मारूती धोंडू केंगले, पोखरी माजी सरपंच बाळासाहेब कोळप, ग्रामसेवक मंगेश केंगले, दिनकर ओव्हाळ व जागा मालक उपस्थित होते. माळीणची घटना घडल्यानंतर संभाव्य धोकादायक गावांचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये भगतवाडी, पसारवाडी, असाणे, बेंढारवाडी, जांभोरी गावची काळवाडी १ व २ तसेच मेघोली या गावांना नैसर्गिक आपत्तीमुळे अतिसंवेदनशिल असल्याचे समोर आले.

या अनुशंगाने तहसिलदार रमा जोशी यांनी संबंधित गावांतील जागा मालकांची बैठक तहसिल कार्यालय घोडेगाव येथे आयोजित केली होती. यात पुनर्वसनाबाबत मागील काही वर्षात अनेक बैठका प्रांत अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सभापती संबंधित गावांतील सरपंच, ग्रामस्थ यांच्या उपस्थित होवून यात जागा मालकांकडून पाचशे रूपये स्टॅंपवर संमतीपत्र, ग्रामपंचायतींकडून घरांच्या नोंदी, ८ अ उतारे, लोकसंख्या दाखला, ग्रामसभेचे ठराव, मागणी, इतिवृतांत्त आदि पुर्तता करून घेतली. यामध्ये पोखरीची बेंढारवाडी, माळीणची पसारवाडी, फुलवडे येथील भगतवाडी, जांभोरी काळवाडी नं. १ व मेघोली येथील मालकांनी शासनाच्या नमुन्यानुसार संमतीपत्र करून दिले आहेत.

यामध्ये परिपुर्ण प्रस्तावात जांभोरी काळवाडी नं. १, मेघोली या दोन गावांची नव्याने विविध नमुन्यातील अर्ज, ठरावची प्रत व इतिवृत्तांत दयावयाचे आहे. पोखरी बेंढारवाडी व पसारवाडी येथील जमिन मालक व इतर सह धारक यांनी पाचशे रूपये स्टॅंपवर संमतीपत्र सादर करून ग्रामसभा ठरावची प्रत व इतिवृत दयावयाची आहे. यामध्ये फुलवडेची भगतवाडी येथील आठ कुटुंबांना घरकुल मिळाल्याने त्यांना लाभ देणे शक्य नाही तर दहा कुटुंबांना घरे देणे बाकी आहे. परंतु त्यांनाही जागा उपलब्ध झाली नसल्याने ही दहा कुटुंब आपआपल्या जागेत घरे बांधणार आहे. तर जांभोरी येथील काळवाडी नं. २ यांनी अदयाप जागाच उपलब्ध करून दिले नसल्याचे सरपंच संजय केंगले यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News