स्वातंत्र्य दिनी महिला बसणार आमरण उपोषणाला...वासुंदे येथील श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयातील महिला शिक्षकेला १९ वर्ष वेठबीगारी काम करुन दाखवला घरचा रस्ता


स्वातंत्र्य दिनी महिला बसणार आमरण उपोषणाला...वासुंदे येथील श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयातील महिला शिक्षकेला १९ वर्ष वेठबीगारी काम करुन दाखवला घरचा रस्ता

: प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) दौंड तालुक्यातील वासुंदे येथील श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयात १५ ऑगस्ट २०२१ रोजी राजश्री मधुकर भोसले या शिक्षीकेवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमरण उपोषणाला बसणार असुन याबाबत लेखी निवेदन तहसीलदार, दौंड पोलीस स्टेशन, गटशिक्षण अधिकारी दौंड, पंचायत समिती तसेच संस्थेचे अध्यक्ष यांना लेखी निवेदन दिले आहे. 

       गेली १९ वर्षं राजश्री भोसले या शिक्षीका श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालय वासुंदे या शाळेत विनावेतन १रु न घेता काम करत आहेत. आज काम होईल उदया काम होईल या आशेने काम करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष तसेच सचीव हे तु माझ्या मुलीसारखी आहे तुझ काम करणार असे सांगुण वेळ मारुन नेत, तसेच २०१३ पासुन संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला जोडण्यात येणार आहे जर कोणी कोठे तक्रारी अर्ज केला तर संस्था जोडण्याची रद्द होईल व याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहताल असे सांगीतले. तसेच वेळोवेळी संस्थेच्या मिटिंगमध्ये मान्यते बद्दल विचारले तर मुख्याध्यापक रत्नदिप गवळी, सचीव कुलदिप हासबे (यादव), शशिकांत जांबले, अध्यक्ष मानसिंग साळुंके हे डिसेंबर २०२० पर्यंत मुलांच्या शपथ घेऊन सांगत की आम्ही कोणाचीच मान्यता काढल्या नाहीत येथे रोष्टर आसल्याने  कोणाचीच मान्यता निघत नाहीत असे सांगत.

         तसेच ३१ में २०२१ रोजी गवळी मुख्याध्यापक हे सेवानिवृत्त झाले त्यावेळी संस्थेला भोसले मॅडम यांनी प्रस्ताव मागीतला असता चार मान्यता काढल्या असुन तुमची मान्यता निघत नाही असे सांगण्यात आले. याबद्दल संस्थेला विचारले तर तुम्हाला समजल नाय का कसं काम करायचे, १९ वर्षं झोपला होता का असे सांगुन भोसले यांना फसवण्यात आले.

         न्याय मिळावा यासाठी भोसले मॅडम यांनी शिक्षण अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. तेथेही कोणिच दाद दिली नाही. याबद्दल न्याय मिळावा यासाठी लेखी निवेदन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. संस्थेलाही वेळोवेळी लेखी निवेदन दिले, तरीही कोणीच दखल घेतली नाही.


चौकट- मी राजश्री मधुकर भोसले सासर सोडुन १४ वर्षं उंडवडी सुपे येथे राहत आहे .आज न उध्या संस्था काम करेल , संस्थेने माझी  वयाची १९ वर्षं वाया घालवुन माझा संसार उघड्यावर पडला आहे. मला न्याय मिळावा यासाठी मी उपाशी तापाशी सात महिने पळतेय तरीही कोठेच न्याय मिळेना यासाठी मी १५ ऑगस्ट पासुन शाळेच्या गेटवर उपोषणाला बसणार आसुन मला काही कमी जास्त झाले तर याला संस्थेचे अध्यक्ष मानसिंग साळुंके, सचीव कुलदीप हासबे(यादव) , शशिकांत जांबले , माजी मुख्याध्यापक रत्नदिप गवळी, शिवाजी यादव हे सर्वस्वी जबाबदार राहतील आसे मत भोसले मॅडम यांनी व्यक्त केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News